शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीची कर वसुली ठप्प...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 15:26 IST

नांदूरशिंगोटे : ऐन मार्च एंडच्या शेवटच्या टप्प्यात कोरोना विषाणू संसर्ग थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्वत्र व्यवसाय, व्यापार, जनजीवन ठप्प झाले होते. गेल्या काही मिहन्यापासून ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर देखील याचा चांगलाच परिणाम झाला. मागील पाच मिहन्यात सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीची कर वसुली शून्य टक्क्यांवर येऊन ठेपली असून, याचा परिणाम विकासकामांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आठवडे बाजार बंद असल्याने त्याची लिलाव प्रक्रि याही थांबलेली आहेत.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : आठवडे बाजार लिलावाची प्रकिया थांबली

नांदूरशिंगोटे : ऐन मार्च एंडच्या शेवटच्या टप्प्यात कोरोना विषाणू संसर्ग थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्वत्र व्यवसाय, व्यापार, जनजीवन ठप्प झाले होते. गेल्या काही मिहन्यापासून ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर देखील याचा चांगलाच परिणाम झाला. मागील पाच मिहन्यात सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीची कर वसुली शून्य टक्क्यांवर येऊन ठेपली असून, याचा परिणाम विकासकामांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आठवडे बाजार बंद असल्याने त्याची लिलाव प्रक्रि याही थांबलेली आहेत.मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, आठवडे बाजार लिलाव, व्यावसायिक कर, दुकान गाळे भाडे यातून येणारे उत्पन्न ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीच्या फंडात जमा केले जाते. या फंडामधून दैनंदिन किरकोळ कामे, पाणी पुरवठा कर्मचारी वेतन, कंत्राटी कामगारांचे वेतन, किरकोळ साहित्य खरेदी, स्टेशनरी, बांधकाम याशिवाय परिस्थिती निहाय गावात निघणारी तातडीची कामे केली जातात. दरवर्षी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे 80 ते 90 टक्क्यांच्या जवळपास करांची वसुली होत असते. विशेषत: आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्च मिहन्यात ही वसुली मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जाते. मात्र यंदा मार्च मिहन्यातच कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लाँकडाऊन करण्यात आले. याचा परिणाम कर वसुलीवर झाला आहे. राज्यात टप्याटप्याने व्यवहार सुरळीत होत असले तरी काही प्रमाणात निर्बंध असल्याने पूर्वपदावर येण्यास मोठा कालावधी लागणार आहे. ग्रामीण भागातील व्यवसाय सुरु झाले असले तरी पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक बाहेर पडत नाही. ग्रामीण भागात कोरोना बाधित रु ग्ण आढळल्यास प्रशासन सदर ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करतात. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होताच त्याचा परिणाम बाजारपेठवर होतो.सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ तसेच कृषी उत्पन्न बाजार समतिीचे उपबाजार आवार असल्याने मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. दर शुक्र वारी येथे आठवडे बाजार व उपबाजारात कांदा लिलाव तसेच धान्य भुसार मालाचे लिलाव होतात. आठवडे बाजारातून ग्रामपंचायतीला दरवर्षी उत्पन्न मिळते. ही कर वसुली करण्यासाठी लिलाव प्रक्रि या करून ठेकेदाराला कर वसुलीसाठी परवानगी दिली जाते. त्याच्या बदल्यात त्याच्याकडून एक विशिष्ट रक्कम घेतली जाते. यावर्षी मात्र कोरोना संसर्गामुळे बाजार वसुली लिलावाचीप्रक्रि याही झालेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पान्नावर मोठा परिणाम झाला आहे.ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुली गेल्या सहा मिहन्यापासून ठप्प झालेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा परिणाम होवून जनजीवन विस्कळीत होत आहे. आठवडे बाजार बंद असल्याने वसुली लिलाव प्रक्रि याही थांबली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवरु न खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात काटकसर करून ग्रामपंचायत कामकाजाचे नियोजन करण्यात येईल.गोपाल शेळके, सरपंच, नांदूरशिंगोटे

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsinnar-acसिन्नर