नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आॅनलाइन नामांकन भरण्याचा राज्य निवडणूक आयोगाच्या हेक्याचा फटका शुक्रवारी दुसऱ्या दिवशी अनेक उमेदवार व निवडणूक अधिकाऱ्यांना बसला. ग्रामपंचायत पातळीवर ८० टक्के ठिकाणी इंटरनेटची सुविधा नसल्याने उमेदवार व निवडणूक अधिकाऱ्यांना वेळेत नामांकन दाखल करण्यासाठी मुख्यालयापर्यंत धावपळ करूनही आयोगाचा सर्व्हर डाऊन असल्याने माघारी फिरावे लागले. विशेष म्हणजे, नामांकनाच्या पहिल्या दिवशी दिवसभर आयोगाची वेबसाइट उघडली नसल्याने एकही अर्ज दाखल होऊ शकलेला नाही. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एच. सहारिया यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे शुक्रवारी निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, अनेकांनी नामांकन दाखल करण्यात येत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला; परंतु आयोगाच्या निर्णयात कुठलाही बदल होणार नसल्याचे सांगून सहारिया यांनी नामांकन आॅनलाइन करण्याचा आग्रह कायम ठेवत त्यात निवडणूक अधिकारी व मतदान केंद्राध्यक्षांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवत अडचणींची भर टाकली.
ग्रामपंचायत निवडणुकीचा मार्ग खडतरच
By admin | Updated: December 6, 2014 00:44 IST