दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथील ज्ञानेश्वर बाळू गायकवाड (२५) यांचा रात्रीच्या सुमारास राहत्या घरात सर्पदंश झाल्याने नुकताच मृत्यू झाला असून ज्ञानेश्वर गायकवाड हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले होते परंतु दीड वर्षातील कालखंडात आपल्या विकासकामांची चुणूक दाखविण्याअगोदरच त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आपल्या वॉर्डात स्वच्छता ठेवण्यास प्राधान्य दिले होते. त्यांनी गावाच्या विकासाची धुरा अधुरी ठेवली असून त्यांच्या जाण्याने गावातील ग्रामस्थ शोककळेत बुडाले आहेत. (वार्ताहर)
ग्रामपंचायत सदस्याचा सर्पदंशाने मृत्यू
By admin | Updated: September 2, 2016 00:04 IST