न्यायडोंगरी : दोन वर्षांपासून अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित असलेल्या येथील सुमारे दोन हजार २४३ लाभार्थींना अखेर धान्य वाटप करण्यात आले. शासनाकडे सतत पाठपुरावा केल्यावर योजनेचा त्यांना लाभ मिळाला आहे. गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत ७६.३२ टक्के नागरिक या योजनेपासून वंचित होते. याबाबत पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे यांनी लाभार्थी का वंचित आहेत, अशी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा करून त्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळावा यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर तत्कालीन तहसीलदार यांनी शासनाकडे पाठवलेली वंचित लाभार्थ्यांची यादी मंजूर झाली . परंतु त्याचदरम्यान तहसीलदारांची बदली झाल्याने रेंगाळलेल्या यादीसंदर्भात पंचायत समिती सदस्य आणि ग्रामस्थांनी प्रभारी तहसीलदार पूनम दंडिले यांची भेट घेतली. दंडिले यांनी पुरवठा विभागातील अधिकारी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांची बैठक बोलावून २२४३ लाभार्थ्यांना धान्य पुरवठा करण्याचे मंजूर केले. सरपंच गायत्री मोरे यांच्या हस्ते वंचितांना धान्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रामसेवक शरद मोहिते , सुनिता बारी, गोरख बारी,नीलेश निमाने, ऋषिकेश सोनार आदी उपस्थित होते. धान्य घेण्यासाठी लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. (वार्ताहर)
लाभार्थींना धान्य वाटप
By admin | Updated: September 23, 2015 23:13 IST