शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

आबड-लोढा जैन महाविद्यालयात पदवीग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:06 IST

चांदवड : मानवी हिताचे संशोधनाचे प्रश्न आपल्या हृदयात निर्माण व्हावे, देश व समाज याला लक्ष्य मानून आपण सर्जनशील होणं हे येणाºया काळात महत्त्वाचे आहे.

चांदवड : मानवी हिताचे संशोधनाचे प्रश्न आपल्या हृदयात निर्माण व्हावे, देश व समाज याला लक्ष्य मानून आपण सर्जनशील होणं हे येणाºया काळात महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जळगाव विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक, समीक्षक डॉ. केशव तुपे यांनी केले.आबड-लोढा जैन महाविद्यालय, श्री. सुरेशदादा जैन औषधनिर्माण महाविद्यालय, सौ. कांताबाई जैन अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवीग्रहण समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव जवाहरलाल आबड होते. पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. प्रमोद भडकवाडे, विख्यात सर्जन डॉ. रोहन बोरसे, आय.टी. मॅनेजर नितीन पाटील, संस्थेचे संचालक व सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी, महावीर पारख, प्रशासकीय अधिकारी पी.पी. गाळणकर, प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे, प्राचार्य डॉ. सी.डी. उपासनी, प्राचार्य डॉ. जी.एच. जैन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. सी.डी. उपासनी व डॉ. सुदीन दळवे यांनी केला. यावेळी बोलताना डॉ. प्रमोद भडकवाडे यांनी सांगितले की, पूर्वी पदवीदान शब्द होता; मात्र दान ही याचना असते. पदवीग्रहणमध्ये हक्क, अधिकार आहे म्हणून हा पदवीग्रहण समारंभ आहे. पदवी घेऊन न थांबता पुढे जा, नवनवीन संधी व आव्हाने स्वीकारा. डॉ. केशव तुपे यांनी सांगितले की, . नेमिनाथ जैन संस्था हे अभिमत विद्यापीठ व्हावे, इतके दर्जेदार काम त्यांनी उभारले आहे.जवाहरलाल आबड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. जी.एच. जैन यांनी आभार मानले. यानंतर पदवीग्रहण समारंभाची सूत्रे डॉ. विशाल गुळेचा, डॉ. सुदीन दळवे, डॉ. दीपक पाटील, डॉ. संजय पाटील यांनी सांभाळलीत, तर सूत्रसंचालन डॉ. तुषार चांदवडकर यांनी केले.