शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे गावात ‘शासन आपल्या गावात’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:02 IST

शासन आपल्या गावात उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकलहरे गावातील मारुती मंदिरामध्ये मंगळवारी शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांना सांगून सुमारे १५० रेशन कार्ड जागेवरच वितरित केले.

एकलहरे : शासन आपल्या गावात उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकलहरे गावातील मारुती मंदिरामध्ये मंगळवारी शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांना सांगून सुमारे १५० रेशन कार्ड जागेवरच वितरित केले.  शासन आपल्या गावात या उपक्रमांतर्गत तहसीलदार राजश्री आहिरराव व इतर अधिकारी मंगळवारी सकाळी एकलहरे गावातील मारुती मंदिरात दाखल झाले. त्यानंतर अहिरराव यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून शासनाच्या वतीने देण्यात येणारे विविध दाखले, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना आदी योजनांची माहिती दिली. तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी अर्ज भरून घेत कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जागेवरच सुमारे १५० जणांना रेशन कार्ड वितरित केले. तसेच ५० हून अधिक जणांना संजय गांधी निराधार योजनेचे कार्ड देण्यात आले. यावेळी परिसरातील रेशन दुकानदार आपले दप्तर घेउन हजर होते. ज्यांनी काही कारणास्तव  अंगठे दिले नाहीत त्यांनादेखील तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांच्या संमतीने रेशनवरील धान्याचा लाभ घेता येईल, असे अहिरराव यांनी स्पष्ट केले.या उपक्रमाप्रसंगी पुरवठा विभागातील सुनीता पाटील, नरेंद्र ब्राहिकर, देवीदास उदार, ज्ञानेश्वर धांडे, जयश्री आहिरराव, प्रवीण पाटील, माया शिवदे, सतीश बोडके, परिघा उपासनी, सुरेश वाघ, मंडल अधिकारी सईद शेख, तलाठी संजय साळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर जाधव व आभार रामदास पाटील यांनी मानले. यावेळी एकलहरा परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय