शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:55 IST

शहर व परिसरातील मुख्य चौकांमध्ये शनिवारी (दि.२४) ‘एकीकडे गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी मे’ अशी वेगवेगळी गीते, तर दुसरीकडे त्या तालांवर हंडी फोडण्यासाठी चिमुकल्याची चाललेली धडपड अशा उत्साहपूर्ण वातावरणात कालाष्टमी अर्थात गोपाळकाला उत्साहात पार पडला. दरम्यान, काही मंडळांनी यंदा दहीहंडीचा उपक्र म रद्द करून त्यासाठी जमा झालेली रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली आहे.

नाशिक : शहर व परिसरातील मुख्य चौकांमध्ये शनिवारी (दि.२४) ‘एकीकडे गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी मे’ अशी वेगवेगळी गीते, तर दुसरीकडे त्या तालांवर हंडी फोडण्यासाठी चिमुकल्याची चाललेली धडपड अशा उत्साहपूर्ण वातावरणात कालाष्टमी अर्थात गोपाळकाला उत्साहात पार पडला. दरम्यान, काही मंडळांनी यंदा दहीहंडीचा उपक्र म रद्द करून त्यासाठी जमा झालेली रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली आहे.विविध वयोगटांतील दहीहंडीप्रेमींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंचवटी, सिडको, गोदाघाट येथील मंडळांनी आपापल्या भागात लहान-मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले होते. शहर व परिसरात दहीहंडीचा उपक्र म प्रामुख्याने काही शाळांमध्ये उत्साहात साजरा झाला. रात्री उशिरापर्यंत दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद घेत नागरिकांनी उत्सवाचा आनंद लुटला. शहरात काही मंडळांनी या उपक्र माचे आयोजन केले.दहीहंडी फोडण्यात यशस्वी झालेल्या संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. दरम्यान, काही शाळांना कलाष्टमीची सुटी होती, तर काही शाळांमध्ये दहीहंडीची जय्यत तयारी दिसून आली. शाळेतील सभागृहात वा मोकळ्या मैदानात दहीहंडीच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा व गोपाळासारखे गीते सादर केली. शिक्षकांच्या मदतीने ठिकठिकाणी बाळगोपाळांनी दहीहंडी फोडत गोपाळ काल्याचा आस्वाद घेतला. बाळगोपाळांनी नृत्य, खेळाच्या माध्यमातून आनंद लुटला.दरम्यान, सिडको परिसरातील मोरवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमी आणि गोपालकाला उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.इस्कॉन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा४द्वारका येथील वृंदावननगरमध्ये असलेल्या श्री राधा मदनगोपाल मंदिर, इस्कॉन येथे शनिवारी (दि.२४) रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. संध्याकाळी ६ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळाली.४सकाळी मंगल आरती, महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद् भागवत प्रवचन-कीर्तन रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर नऊ ते रात्री अकरापर्यंत महाभिषेक करण्यात आला.४साडेअकरा ते १२ वाजेपर्यंत महाआरती होऊन श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा महामहोत्सव इस्कॉन मंदिरात साजरा करण्यात येत आहे. तसेच रविवारी (दि.२५) संध्याकाळी ७ वाजेपासून रात्रीपर्यंत नंदोत्सव साजरा केला जाणार आहे.४जन्माष्टमीनिमित्त मंदिर पूर्णवेळ भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. ‘हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे..’चा जयघोषाने मंदिर दुमदुमले होते.

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीNashikनाशिक