शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामकाज आठवडाभर ठप्प

By admin | Updated: February 23, 2017 00:28 IST

शासकीय कामकाज आठवडाभर ठप्प

नाशिक : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संपूर्ण शासकीय यंत्रणा गुंतून पडल्यामुळे व लागोपाठ तीन दिवस शासकीय सुटी आल्याने चालू आठवड्यात शासकीय कामकाज पूर्णत: ठप्प होणार आहे.  नाशिक महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी हजारो कर्मचाऱ्यांचे बळ प्रशासनाला उभे करावे लागले असून, त्यासाठी प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कार्यालयांचीही मदत घेण्यात आली आहे. विशेष करून जिल्हा परिषद, महापालिका, महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांचाच यात अधिक भरणार असल्याने या निवडणूक कामांमुळे त्यांच्या दैनंदिन शासकीय कामांवर यापूर्वीच परिणाम झालेला असताना चालू आठवडा तर शासकीय कामकाज बाजूला ठेवून त्यांना फक्त निवडणूक कामांनाच प्राधान्य द्यावे लागले आहे. जिल्ह्यात मंगळवारी मतदान घेण्यात आले असले तरी, सोमवारी सकाळी या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण आटोपल्यानंतर दुपारनंतर हेच अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्यासह थेट मतदान केंद्रावर रवाना झाले.  मंगळवार पूर्ण दिवस व रात्री उशिरापर्यंत हे कर्मचारी मतदान प्रक्रियेत व्यस्त असल्यामुळे बुधवारी शासकीय कार्यालयांमध्ये अगदीच अल्प उपस्थिती होती. मात्र गुरुवारी पुन्हा शासकीय अधिकारी व कर्मचारी महापालिका, जिल्हा परिषदेच्या मतमोजणीत व्यस्त राहणार असल्यामुळे शासकीय कार्यालये पुन्हा ओस पडणार आहेत.