शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्रीमियम दरवाढीबाबत शासनच निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:48 IST

नवीन विकास आराखड्यानुसार बांधकामांना आकारण्यात येणाºया प्रीमियममध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्याबाबत शासनच निर्णय घेणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्पष्ट करत त्यात कसलाही बदल होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

नाशिक : नवीन विकास आराखड्यानुसार बांधकामांना आकारण्यात येणाºया प्रीमियममध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्याबाबत शासनच निर्णय घेणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्पष्ट करत त्यात कसलाही बदल होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.  नवीन विकास आराखड्यानुसार बांधकामांना आकारण्यात येणाºया प्रीमियममध्ये (अधिमूल्य) दुप्पट वाढ करण्याचे घाटत आहे. त्याबाबत दरवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. मूळ प्रस्तावात रेडीरेकनरच्या तुलनेत १५ टक्के इतकेच प्रीमियम होते. मात्र शासनाने ते ४० टक्के केले. त्याला दोन महिने होत नाही तोच आता ४० वरून ८० टक्के इतके दुप्पट करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.  याशिवाय, महापालिकेचे आरक्षित भूखंड शेतकºयांकडून खरेदी करून त्या बदल्यात महापालिकेकडून टीडीआर खरेदी करणाºया या लॉबीच्या दबावाखाली हा प्रस्ताव मंजूर केल्यास या भूखंड व्यवहाराच्या तळाशी जाण्याचा आणि भूसंपादन आवश्यक होते काय, आरक्षित भूखंडांची मालकी सध्या कोणाकडे आहे याचा शोध घेण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता.  या साºया पार्श्वभूमीवर आयुक्त अभिषेक कृष्ण यांना प्रीमियम दरवाढीच्या प्रस्तावाबद्दल फेरविचार होणार काय, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता, आयुक्तांनी त्याबाबत शासनच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आयुक्तांनी सांगितले, केवळ नाशिक महापालिकेनेच दरवाढीचा प्रस्ताव पाठविलेला नाही, तर राज्यातील इतरही महापालिकांनी प्रस्ताव दिले आहेत.  शहरात विकासाच्या कामांसाठी निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे निधी आणायचा कुठून, असा सवालही त्यांनी केला आहे.विविध संघटनांचा विरोधप्रीमियम वाढीला क्रेडाई तसेच आर्किटेक्टच्या विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे. दोन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत यामागे शहरातील टीडीआर लॉबी असून, यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप क्रेडाई तसेच आर्किटेक्टच्या विविध संघटनांनी केला होता. याशिवाय, प्रीमियमचे दर चाळीसवरून ऐंशी टक्के झाल्यास घरांच्या किमती प्रचंड भडकणार असून, त्यामुळे सर्वसामान्यांचे गृहस्वप्न भंगण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.