शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागाचे सरकारला वावडे

By admin | Updated: October 30, 2016 01:42 IST

चणाडाळीपासून वंचित : शहरी नागरिकांनाच प्राधान्य

नाशिक : ऐन सणासुदीत चणाडाळीचे भाव आकाशाला भिडल्याने शहरी भागातील निवडक नागरिकांसाठी ७० रुपये प्रती किलो दराने खुल्या बाजारात चणाडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेऊन एक प्रकारे ग्रामीण भागातील नागरिकांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे दिवाळीत ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी चणाडाळीचे चकल्या, शेव करून खाऊ नाही असेच बहुधा सरकारला वाटत असावे.  मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या मुख्य शहरांतील नागरिकांसाठी खुल्या बाजारात ७० रुपये दराने चणाडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला ७०० मेट्रिक टन चणाडाळ दिली असून, राज्य सरकारने या चणाडाळीची भरडाई, पॅकिंग करून या प्रमुख शहरातील शासकीय गुदामात पोहोचविण्यासाठी वाहतूक ठेकेदार नेमण्याची कार्यवाही सुरू केली आहे.  खुल्या बाजारात म्हणजेच रेशन दुकानातून प्रत्येकी एक किलो वजनाचे पॅकेट ७० रुपये या दराने चणाडाळ विक्री केली जाणार असून, ग्राहकांना हवी तितकी चणाडाळ खरेदी करता येणार आहे. ही सुविधा फक्त शहरी भागातील नागरिकांसाठीच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुरवठा खात्याच्या म्हणण्यानुसार खुल्या बाजारात म्हणजेच रेशनवर चणाडाळ विक्रीसाठी आल्यावर त्याचा परिणाम खुल्या बाजारात खासगी व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी असलेल्या चणाडाळीच्या दरावर होणार आहे. सामान्य ग्राहकांना रेशनवर ७० रुपयांत चणाडाळ मिळाल्यास व्यापाऱ्यांकडील चणाडाळीला ग्राहक राहणार नाही, असे गृहीतक पुरवठा विभाग मांडत असले तरी, चणाडाळीचे दर घसरल्यास म्हणजेच ७० रूपयांपेक्षा खाली आल्यास रेशनमधून विक्री केल्या जाणाऱ्या चणाडाळीलाही ग्राहक मिळणार नसल्याचा दावा केला जात आहे. रेशन दुकानदारच साशंकयाबाबत रेशन दुकानदारच साशंक असून, त्यांच्यासमोर तुरडाळीचा अनुभव अजूनही ताजा आहे. तुरडाळीबाबत शासनाने अशाच प्रकारचे धोरण स्वीकारले, परंतु रेशनवरील व खुल्या बाजारातील तुरडाळीचे दर समान पातळीवर आल्यानंतर ग्राहकांनी रेशनच्या तुरडाळीकडे पाठ फिरविली होती. हा सारा इतिहास लक्षात घेता, शासनाने फक्त शहरी भागातच चणाडाळ पुरविण्याचा निर्णय घेतला परंतु त्यातून ग्रामीण भागावर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.