शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीसाठी सरकार चर्चेला तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:58 IST

समृद्धीसाठी सरकार चर्चेला तयार गिरीश महाजन : महामार्ग होणारच

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार असून, महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करून शेतकऱ्यांनी त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, राज्यातील नागपूरपासून शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढे होत समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास सुरुवात केली आहे. अन्य भागातूनही या महामार्गाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिक जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या समृद्धी महामार्गाला असलेल्या विरोधाकडे महाजन यांचे लक्ष वेधले असता, नाशिक जिल्ह्णासाठी अलीकडेच जमिनींचे दर जाहीर करण्यात आले असून, त्यात शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्यात आले आहेत. अन्य प्रकल्पांसाठी अगोदर सरकारकडून जमीन संपादित केली जात व नंतर शेतकऱ्यांना दहा, पंधरा वर्षांनंतर मोबदला मिळत होता परंतु या महामार्गासाठी थेट खरेदीने शेतकऱ्यांची जमीन घेतली जाणार आहे व त्याचा मोबदलाही तत्काळ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे काही प्रश्न असतील तर सरकारकडे चर्चेसाठी यावे सरकार चर्चेला तयार आहे असे सांगून, कोणत्याही शेतकऱ्याची जमीन बळजबरीने घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या गावांमध्ये मोजणी झालेली नाही तेथील शेतकऱ्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.