शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 18:24 IST

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकºयांचा रोष ओढविण्याची भीती सरकारला वाटल्यामुळे चार दिवस उशिराने का होईना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात शनिवारपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, सलग तीन दिवस मुक्काम ठोकणा-या या

ठळक मुद्देदोन दिवसांत अहवाल : शेतमालाची काढणार छायाचित्रे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून थैमान घालणारा अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतमालाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले असून, त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष शेतक-याच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सदरचे पंचनामे करताना नुकसान झालेल्या शेतमालाची पुराव्यादाखल छायाचित्रे काढून पंचनाम्यावर संबंधित शेतक-यांची स्वाक्षरी घेण्याचेही निर्देश दिले आहेत.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतक-यांचा रोष ओढविण्याची भीती सरकारला वाटल्यामुळे चार दिवस उशिराने का होईना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात शनिवारपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, सलग तीन दिवस मुक्काम ठोकणाºया या पावसामुळे वादळी वारा, गारपीट व विजेचा प्रकोप होऊन आठ जणांना आपला जीव गमवावा लागला तर मोठ्या प्रमाणावर जनावरेही दगावली आहेत. सर्वाधिक नुकसान शेतक-यांच्या द्राक्ष, कांदा, गहू, भाजीपाला, डाळिंब या पिकांचे झाले असून, शेकडो एकरवरील पिके गारपिटीने जमीनदोस्त झाली. खळ्यावर काढून ठेवलेला उन्हाळ कांदा भिजला, तर द्राक्षबागा कोलमडून पडल्या आहेत. अगोदरच खरीप हंगाम पावसाअभावी गेल्याने हवालदिल झालेला शेतक-याने रब्बीवर आपली भिस्त ठेवली होती. तीदेखील अस्मानी संकटाने उद्ध्वस्त झाली. जिल्ह्यातील शेतकरी अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे त्रस्त झालेले असताना शासनाकडून मात्र पंचनामे करण्याचे कोणतेही आदेश देण्यात न आल्याने महसूल यंत्रणा हतबल झाली होती. दुसरीकडे प्रशासनाकडून पंचनामे होत नसल्याचे पाहून शेतक-यांनी सरकारवर राग व्यक्त करीत, आवरासारव करण्यास सुरुवात केली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतक-यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याची जाणीव झाल्याने सरकारने बुधवारी यासंदर्भात आदेश जारी केले असून, त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना आपल्या कार्यक्षेत्रातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. येत्या दोन दिवसांत या संदर्भातील अहवाल तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाºयांच्या स्वाक्षरीने सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. पंचनामा करताना पीक नुकसानीची टक्केवारीमध्ये ३३ टक्केपेक्षा कमी किंवा जास्त याबाबतचा स्पष्ट उल्लेख करण्याचे तसेच नुकसान झालेल्या शेतमालाची छायाचित्रे काढण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे शेतक-यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय