शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची ‘लॅपटॉप’ खरेदी वादात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:50 IST

संगणकीय सातबारा उताºयाचे काम करण्यासाठी शासनाने जादा दराने खरेदी केलेले ‘लॅपटॉप’ वादाच्या भोवºयात सापडले असून, खुल्या बाजारात ४० हजारापर्यंत मिळणारे अत्याधुनिक लॅपटॉप राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ६२ हजार रुपयांना खरेदी केल्याची तक्रार राज्यभरातून होऊ लागताच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाºयांकडून या खरेदी संदर्भातील कागदपत्रे तातडीने मागविली आहेत.

नाशिक : संगणकीय सातबारा उताºयाचे काम करण्यासाठी शासनाने जादा दराने खरेदी केलेले ‘लॅपटॉप’ वादाच्या भोवºयात सापडले असून, खुल्या बाजारात ४० हजारापर्यंत मिळणारे अत्याधुनिक लॅपटॉप राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ६२ हजार रुपयांना खरेदी केल्याची तक्रार राज्यभरातून होऊ लागताच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाºयांकडून या खरेदी संदर्भातील कागदपत्रे तातडीने मागविली आहेत.  संगणकीय सातबारा, आॅनलाइन फेरफार यांसह तलाठी, मंडळ अधिकाºयांच्या अखत्यारितील तत्सम कामासाठी शासनाच्या वतीने लॅपटॉप देण्याचे ठरविण्यात आले होते. राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने यासंदर्भातील तांत्रिक बाबी पाहून खरेदी करावी, असेही ठरले होते व त्यानुसार प्रत्येक जिल्ह्णाने आपल्याकडील तलाठी व मंडळ अधिकाºयांची संख्या पाहून शासनाला कळविले होते. वर्षभरापूर्वी नाशिक जिल्हा प्रशासनाने  जिल्ह्णातील ४९२ तलाठी व ९२ मंडळ अधिकाºयांची संख्या गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने खुल्या बाजारात चांगल्या कंपनीचे मिळणारे लॅपटॉपचे दर पाहता साधारणत: अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता. लॅपटॉपच्या या खर्चात तितकेच प्रिंटरही घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.तलाठ्यांना लॅपटॉप देण्यासाठी येणाºया खर्चाची तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून भागविण्यात आला व साधारणत: वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला अडीच कोटी रुपये वर्ग केले, तेव्हापासून जिल्ह्णाला लॅपटॉपची प्रतीक्षा होती. राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने लॅपटॉप खरेदीसाठी राज्यपातळीवर निविदा मागविल्या असता त्यातील कमी दर ‘कॉमनेट सोल्युशन प्रा. लि.’ या अंधेरी पूर्व, मुंबई या कंपनीने भरल्यामुळे या कंपनीकडून ‘डेल’ या नामांकित कंपनीचे लॅपटॉपची संपूर्ण राज्यासाठी ४२७५ इतके नग खरेदी करण्यात आले आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती मागविली आहे.एका लॅपटॉपची किंमत ६१ हजार २५७ रुपये इतकी लावण्यात आली असून, जिल्ह्णाने पाठविलेल्या अडीच कोटी रुपयांत निम्मेच म्हणजे ३५५ इतकेच लॅपटॉप खरेदी करता आल्याने दोन दिवसांपूर्वी ते नाशिकला पाठविण्यात आले होते. परंतु खुल्या बाजारात त्याचे दर अवघे ४० ते ४५ हजार रुपये इतके असताना शासनाने जादा दराने खरेदी करण्यामागे संशय व्यक्त केला जात होता.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार