शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी व्यवसाय करणाºया मनपातील डॉक्टरांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 15:17 IST

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयात सेवारत असतानाही खासगीरीत्या दवाखाने चालविणाºया डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी त्याबाबतचा चौकशी अहवाल तातडीने देण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षकांना दिले.स्थायी समितीच्या बैठकीत मुशीर सय्यद यांनी नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर हे सेवेत असतानाही खासगी दवाखाना ...

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयात सेवारत असतानाही खासगीरीत्या दवाखाने चालविणाºया डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी त्याबाबतचा चौकशी अहवाल तातडीने देण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षकांना दिले.स्थायी समितीच्या बैठकीत मुशीर सय्यद यांनी नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर हे सेवेत असतानाही खासगी दवाखाना चालवित असल्याचा आरोप केला. या आरोपादाखल त्यांनी रुग्णतपासणीचे काही पुरावेही सभागृहाला सादर केले. शासकीय सेवेत असताना डॉक्टरांना खासगी प्रॅक्टीस करता येत नाही, असा नियम असतानाही डॉ. फुलकर हे नियमभंग करत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीतही काहीच सुधारणा नाही. त्यामुळे डॉ. फुलकर यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुशीर सय्यद यांनी केली. सीमा ताजणे यांनीही बिटको रुग्णालयातील भोंगळ कारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले आणि वैद्यकीय अधिकाºयाबद्दल तक्रार केली. त्यावर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सदर डॉक्टरची चौकशी करण्याबरोबरच अन्य डॉक्टरही खासगी प्रॅक्टीस करत असल्यास त्याबाबतचा अहवाल पुढच्या सभेत सादर करण्याचे आदेश दिले.