शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची कर्जमाफी फसवी

By admin | Updated: June 18, 2017 00:44 IST

देवीदास पवार : सरकार चले जावची भूमिका घेऊन पुन्हा उतरणार रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : भाजपा सरकारकडे संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची मागणी केलेली असताना तत्त्वत:, सरसकट आणि निकषांच्या आधीन असलेली सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करणारी आहे. त्यामुळे सातबारा कोरा करा या मागणीसाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी सरकार ‘चले जाव’ची भूमिका घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी दिला. तातडीने द्यावयाच्या दहा हजार रुपये पीककर्जाचे आदेश त्यातील निकषही शेतकऱ्यांचा अंत पाहणारे आहेत, त्यामुळे ही कर्जमाफीही फसवी असून, सातबारा कोरा होणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे आहे. याच मागणीकरिता आता सरकारच्या विरोधात उभे रहावे यावर शेतकरी संघटनेकडून विचारमंथन सुरू झाले असल्याचे पवार यांनी सांगितले.पवार पुढे म्हणाले की, आजची स्थिती अत्यंत वाईट आहे. शेतकरी खरिपाच्या पेरणीकरिता बी-बियाणे खरेदीसाठी पैसे नाहीत म्हणून थांबला आहे, तर सरकारने तातडीने दहा हजारांचे पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश काढले असले तरी सरकारी इतर बँकांना अद्यापही तसे निर्देश नाहीत. ही योजना राबवायला सरकारी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नाही, आदेश मात्र निघत आहेत. त्याची अंमलबजावणी कोणी करायची? त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वत: आंदोलन उभे करून त्याचे नेतृत्व करायला पुढे आले पाहिजे. सातबारा कोरा व्हावा या प्रमुख मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे. कारण, त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा ही घोषणा केलेली मागणी सरकारने पुर्ण करावी अन्यथा सरकार चले जावची भूमिका घेऊन संघटनेला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.शेतकऱ्यांमध्ये चिंतादेवळा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला होता. परंतु कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरता ठेवलेले निकष पाहता बहुतांश थकबाकीदार शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची चिन्हे दिसत आहेत. या कर्जमाफीसाठी आपण पात्र ठरतो की नाही याबाबत शेतकरी जाणकार व्यक्तींकडून माहिती घेताना दिसत आहेत. थकबाकीदार असलेल्या सभासदांच्या याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.