शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शासन हलले : गजलक्ष्मीच्या उपचारासाठी वनविभागाची धावाधाव वनमंत्र्यांनीच घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:46 IST

नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या लक्ष्मी नावाच्या हत्तिणीचा मूक आक्रोश ‘लोकमत’ने मांडल्यानंतर शासन हलले आहे. या प्रकरणाची वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी दखल घेत ‘लक्ष्मी’वर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्दे‘विव्हळणाºया गजलक्ष्मीचा मूक आक्रोश’लक्ष्मीवर योग्य ते उपचार करण्याचे आदेश

नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या लक्ष्मी नावाच्या हत्तिणीचा मूक आक्रोश ‘लोकमत’ने मांडल्यानंतर शासन हलले आहे. या प्रकरणाची वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी दखल घेत ‘लक्ष्मी’वर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीचा सांभाळ करणाºया संबंधिताने तिची योग्य देखभाल न घेतल्यास त्याचा परवाना रद्द करण्याच्या दृष्टीने योग्य त्या कार्यवाहीच्या सूचनाही वनखात्याला दिल्या आहेत.‘लोकमत’मध्ये ‘विव्हळणाºया गजलक्ष्मीचा मूक आक्रोश’ या नावाने सचित्र वृत्त प्रसारित करण्यात आले होते. वृत्तात लक्ष्मीच्या वेदना अन् तिची होत असलेली फरफट याविषयीचा वृत्तांत मांडला होता. त्याचबरोबर वनविभागाच्या अनास्थेकडेही लक्ष वेधले होते. या वृत्तानंतर प्राणिमित्रांकडून लक्ष्मीच्या सुटकेसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्रकारची चळवळच उभी केली होती. दरम्यान, ‘लोकमत’च्या या वृत्तानंतर वनमंत्रालयानेच या प्रकरणाची दखल घेत लक्ष्मीवर योग्य ते उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना म्हटले की, लक्ष्मीवर तातडीने योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीने पुढील काळात तिची योग्य ती देखभाल न केल्यास त्याचा परवाना रद्द करण्याबाबतही सरकारी पातळीवर विचार केला जाणार आहे. उपचारासाठी लागणारा निधी सरकारी स्तरावर कमी पडल्यास विशेष कल्याणकारी निधीतून लक्ष्मीवर उपचार केले जातील. नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी वनमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने एक समिती गठित केली असून, त्यामध्ये वनविभागाच्या काही अधिकाºयांसह डॉक्टरांचाही समावेश केला आहे. तसेच मुंबई भायखळा येथील प्राणिसंग्रहालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून लक्ष्मीवरील उपचाराबाबतची प्रक्रिया सुरू केली....तर परवाना होणार रद्दसंबंधित व्यक्तीकडे लक्ष्मीचा परवाना असल्याने तिला ताब्यात घेण्यावरून वनविभाग संभ्रमात आहे. मात्र पुढील काळात तिची योग्य देखभाल न केल्यास संबंधित व्यक्तीचा परवाना रद्द करून लक्ष्मीला ताब्यात घेतले जाणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी स्पष्ट केले. त्याबाबतच्या वनविभागाला त्यांनी सूचनाही दिल्या आहेत.