शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन नाशिक’ला शासनाचे सहकार्य

By admin | Updated: April 12, 2017 01:44 IST

पालकमंत्री गिरीश महाजन : नाशिकचे ब्रॅँडिंग करण्याचे आश्वासन

सातपूर : मुंबईत आयोजित ‘मेक इन नाशिक’ उपक्रम यशस्वीतेसाठी शासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करून गुंतवणुकीसाठी नाशिकचे ब्रँडिंग केले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिल्याने नाशिकच्या उद्योग जगतात समाधान व्यक्त केले जात आहे. नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईत नेहरू सेंटर येथे ‘मेक इन नाशिक’ या उपक्र माचे दि. ३० व ३१ मे रोजी आयोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याबाबत शासकीय पातळीवर काय करता येईल यासाठी मंगळवारी (दि.११) मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या समवेत निमा पदाधिकाऱ्यांची तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक झाली. शासकीय पातळीवर सर्वप्रकारचे सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन मंत्रीद्वयींनी दिले आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून नाशिकला एकही मोठा उद्योग प्रकल्प आलेला नसल्याने नाशिकचा औद्योगिक विकास खुंटला आहे. विदर्भ मराठवाड्याला वीजदरात सवलत दिल्याने नाशिकच्या उद्योजकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे नाशिकला मोठे उद्योग प्रकल्प मिळावेत, विमानतळाचा प्रश्न मार्गी लावावा, दिंडोरीला दोन वर्षांपासून ४०० हेक्टर जागा संपादित केली असली तरी अद्याप प्लॉटिंग झालेले नाही. अशा अनेक समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी निमा, एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत मुंबईला ‘मेक इन नाशिक’ हा उपक्र म राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत मुंबईतील मोठ्या उद्योगांशी, मर्चंट्स एक्स्पोर्ट्स, विविध देशांचे दूतावास यांच्याशी संवाद साधून नाशिकच्या विकासाचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमाला जिल्हा प्रशासनाचे शासकीय स्तरावर सर्व सहकार्य लाभणार आहे. बैठकीला आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, हेमंत टकले, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार, सरचिटणीस उदय खरोटे, सचिव ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर, सुरेश माळी, प्रदीप पेशकार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)