शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

सरकारी रुग्णवाहिका खासगी दवाखान्याच्या दारात

By admin | Updated: September 29, 2015 00:05 IST

आरोग्य समिती बैठक : जीपीएसचा मागविला अहवाल

नाशिक : सरकारने गोरगरिबांच्या सोयीसाठी सुरू केलेली १०८ रुग्णवाहिका सेवा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे असून, या रुग्णवाहिका सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना नेण्याऐवजी थेट खासगी रुग्णालयात घेऊन जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.शिक्षण व आरोग्य सभापती किरण थोरे यांच्या उपस्थितीत काल (दि. २८) आरोग्य समितीची मासिक बैठक झाली. बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सिन्नर, दिंडोरी, मालेगाव व बागलाण तालुक्यात दूषित पाणीपुरवठा होत असूनही संबंधित तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात कसूर केल्याचा आरोप बैठकीत सदस्यांनी केला. यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना त्यासंदर्भातील तातडीचे पत्र देण्याचे आदेश सभापती किरण थोरे यांनी दिले. दिंडोरीत पाणी खड्ड्यातून काढून पिण्यात येत असल्याने दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढल्याचे, तसेच सिन्नरला क्लोरिन पावडर नसल्याने आणि बागलाणला अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेला गळती असल्याने, तसेच निफाडला पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरमुळेच दूषित पाणीपुरवठा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्याचप्रमाणे १०८ रुग्णवाहिकेतून मागील महिन्यात जवळपास १३ टक्के रुग्ण हे खासगी रुग्णालयात नेण्यात आले? हे खासगी रुग्णालयात अपघातातील जखमी नेण्यामागे कारण काय? जीपीएस कार्यप्रणाली १०८ रुग्णवाहिकांना बसविलेली असतानाही खासगी रुग्णालयात रुग्णांना का नेण्यात येते? पुढील बैठकीत यासंदर्भात जीपीएस कार्यप्रणालीचा अहवालच सादर करण्यात यावा, अशी मागणी सदस्य डॉ. भारती पवार व मनीषा बोडके यांनी केली. त्यानुसार पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती किरण थोरे यांनी दिले. त्याचप्रमाणे क्षयरोग रोखण्यासाठी थुंकीचे नमुने गोळा करून तपासण्यात येतात. या कार्यक्रमात शिरसगाव (त्र्यंबकेश्वर) येथे थुंकीचा एकही नमुना गोळा करण्यात आलेला नाही. तसेच जिल्ह्णात सर्वत्र किमान लोकसंख्येच्या तीन टक्के नागरिकांचे थुंकीचे नमुने गोळा करण्याचे उद्दिष्ट असताना हे काम १ टक्क्याच्या आसपास असल्याबाबत डॉ. भारती पवार व मनीषा बोडके यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीस सदस्य शरद माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)