शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
8
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
9
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
10
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
11
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
12
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
13
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
14
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
15
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
16
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
17
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
18
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
19
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
20
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?

सहकार आधारावर आता शासनाची दूध योजना

By admin | Updated: February 16, 2017 01:12 IST

दिलासादायक : तीन वर्षांनंतर शासकीय डेअरी खुली

 संदीप भालेराव नाशिकशासनाच्या दुग्धव्यवसाय विभागाने सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यात एकेकाळी धवलक्रांती निर्माण केलेली असताना बंद पडलेल्या शासकीय दूध योजनेला आता सहकारी दूध संघानेच हात दिला आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून अखेरची घटका मोजणाऱ्या नाशकातील शासकीय योजनेला सहकाराचा ‘बुस्ट’ मिळाला आहे. कमी झालेले दुग्धोत्पादन आणि दूध संकलनात होणारी घट यामुळे राज्यातील सुमारे ५० टक्के शासकीय दूध योजना बंद पडलेल्या आहेत. शासकीय दूध योजनेची यंत्रणा, वाहने आणि कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. काही यंत्रसामग्री तर आहे त्या जागी गंजलेल्या अवस्थेत असल्याने शासनाला तोही तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षांपासून दूध योजना बंद होण्याच्याच हालचाली असताना दुग्धविकास आयुक्तांनी शासनाचे ‘आरे’ प्रॉडक्शन सुरू करण्यासाठी सहकाराशी हात मिळवणी केली आहे. त्यानुसार जिल्हा सहकारी दूध संघांशी एक वर्षाचा करार करून शासनाचे दूध आता सहकारी दूध संघाच्या डेअरीत पॅकिंग होत आहे. नाशिक आणि मुंबई मध्ये गेल्या नोव्हेंबरपासून ‘आरे’चे प्रॉडक्शन पुन्हा एकदा सुरू झाले आहे. नाशिकमध्ये गेल्या तीन वर्षांपासून दूध योजनांचे कामकाज ठप्प झाले होते. येथील यंत्रसामग्री गंजली आहे, तर काही यंत्रे शासनाच्याच इतर प्रकल्पांना देण्यात आली आहेत. शासकीय वाहनेदेखील बंद करण्यात आली आहेत. परंतु आता शासनानेच दूध योजनेला पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला असून या दूध योजनांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठीचे पहिले पाऊल उचलण्यात आले आहे. १९६८ साली कारखाना अभियानाखाली स्थापन झालेल्या नाशिक, महाड, कणकवली, मिरज, उदगीर, नांदेड, सोलापूर अशा अनेक ठिकाणच्या शासकीय दूध डेअऱ्या बंद पडलेल्या आहेत. आता शासनाने शासकीय दूध डेअरी सुरू करण्यासाठीचे प्रयत्न चालविले असून, त्यासाठी सहकाराची मदत घेतली जात आहे. पुढच्या टप्प्यात यंत्रणा खरेदी आणि नोकरभरतीचा विचार शासन करीत असल्याने राज्यात पुन्हा शुभ्रक्रांतीला सुरुवात होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.प्रारंभी ज्या सहकारी दूध संघाला शासनाच्या दूध संकलन केंद्राकडे यावे लागत होते त्याच संघाकडे आता शासनाला जावे लागत आहे. दूध संघाची स्वत:ची यंत्रणा निर्माण झाली त्यामुळे शासनाचे दूध संकलनही घटले. राज्यात आता अनेक ठिकाणी सहकारी दूध संघाशी शासनाने करार करून दूध संकलन आणि पॅकिंग सुरू केले आहे. हा करार वर्षभरासाठीच असून, करारात वाढ केली जाईल, असे आश्वासन सहकारी दूध संघांना देण्यात आलेले आहे. आता शासनाने पुन्हा शासकीय दूध योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतल्याने आणि त्यासाठी तरतूदही केल्याने संघाचे काम कमी होण्याचा धोका वर्तविण्यात आल्यामुळे दूध संघाकडून विरोधाचा सूरही निघू शकतो.