शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गॅस एजन्सीवरील कारवाई गुलदस्त्यात

By admin | Updated: December 25, 2014 01:48 IST

गॅस एजन्सीवरील कारवाई गुलदस्त्यात

 मालेगाव : येथील संगमेश्वर भागातील गॅस एजन्सीच्या मनमानीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शहर धान्य वितरण अधिकाऱ्यांकडे कलिम सिकंदर अन्सारी यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे. या अर्जावर सुमारे पंधरा दिवसांनंतर केलेल्या कारवाईची माहिती घेतली असता पुरवठा अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसानंतर अर्जदाराला जबाब घेण्यासाठी बोलाविल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. अन्सारी यांनी २४ नोव्हेंबर, रोजी दिलेल्या तक्रार अर्जात सदर गॅस एजन्सी मनमानी पध्दतीने कारभार करत असून, नवीन गॅस जोडणी घेण्यासाठी तवा, शेगडी, चहापत्ती, लाइटर, कुकर घेण्याची सक्ती करते. या वस्तू देताना बाजारभावापेक्षा जास्त किंमत आकारते. या वस्तू न घेतल्यास गॅसची जोडणी देण्यास टाळाटाळ करत असून, गॅस जोडणी अर्जासाठी वेगळे ७५ रुपये घेते; मात्र त्याची कोणतीही पावती देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. एजन्सीच्या व्यवस्थापकाकडे तक्रार बुकची मागणी केली असता दिले जात नाही. एजन्सीज ग्राहक संरक्षण कायदा १९८६चे उल्लंघन करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सदर एजन्सीची नियमानुसार चौकशी करून त्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या अर्जावर केलेल्या कारवाईविषयी माहिती गुलदस्त्यात असून, येथील पुरवठा अधिकाऱ्यांकडे पंधरा दिवसांनंतर चौकशी केली असता सदर तक्रारदार आपल्या समोर बसलेले असून, त्यांचे जबाब घेण्यात येत असल्याचे सांगितले. शासनाच्या नियमानुसार कोणताही तक्रार अर्ज आठ ते दहा दिवसांत निकाली काढण्याचा नियम असल्याची माहिती आहे. मात्र, या तक्रार अर्जावर पंधरा दिवसानंतर जबाब घेण्यात येतो. यावरून संबंधित विभाग दुकानदाराला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करतात. या नागरिकांच्या आरोपाला पुष्टी मिळते. संबंधित दुकानाविरोधात कामय तक्रारी असूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)