शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रणालयाचा गोरेवाडी गेट सहा महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:30 IST

नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालय स्टाफ क्वॉर्टर येथील गोरेवाडी गेट मुद्रणालय प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून पुन्हा बंद केल्याने गेल्या सहा महिन्यांपासून गोरेवाडीवासीयांची मोठी गैरसोय होत असून, हजारो नागरिकांना दररोज मोठा वळसा घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.

ठळक मुद्देव्यवस्थापनाचा निर्णय : हजारो नागरिकांना घालावा लागतो वळसा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालय स्टाफ क्वॉर्टर येथील गोरेवाडी गेट मुद्रणालय प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून पुन्हा बंद केल्याने गेल्या सहा महिन्यांपासून गोरेवाडीवासीयांची मोठी गैरसोय होत असून, हजारो नागरिकांना दररोज मोठा वळसा घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.गेल्या वर्षी मुद्रणालय प्रशासनाला धमकीचे निनावी पत्र आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव स्टाफ क्वॉर्टर येथील गोरेवाडी गेट बंद करण्यात आले होते. यामुळे गोरेवाडीवासीयांना के. एन. केला शाळा रस्त्याने ये-जा करावी लागत होती. मात्र वृत्तपत्रात गैरसोयीबाबत वृत्त छापून आल्यानंतर गेट पुन्हा उघडण्यात आला होता. तेथून प्रारंभी कामगारांनाच सोडले जात होते. वनिता विकास शाळेत जाणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी यांची व परिसरातील रहिवाशांची गरज लक्षात घेऊन गोरेवाडी गेट सुरू करण्यात आले होते.मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुद्रणालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लागलीच स्टाफ क्वॉर्टर येथील गोरेवाडी गेट बंद करून टाकला. गेल्या सहा महिन्यांपासून गोरेवाडी गेट बंद असल्याने गोरेवाडीवासीयांना दूरवरून के. एन. केला शाळा येथून जेलरोड मार्गे यावे-जावे लागत आहे. त्यामुळे सर्वांचीच मोठी गैरसोय होत आहे. इंधन, वेळ जास्त खर्च होत आहे. तसेच जवळचा मार्ग सोडून लांबवरून फिरून यावे-जावे लागत असल्याने जेलरोड रस्त्यावर वाहतुकीचा भारदेखील वाढला आहे. कोरोनाची सबब पुढे करून मुद्रणालय प्रशासन आडमुठे धोरण अंगीकारत असल्याने सर्वसामान्य जनतेला त्रास होत असल्याची तक्रार केली जात आहे. जेलरोड, गोरेवाडी भागातून येणारे प्रेस कामगार यांनादेखील गेट बंद असल्याकारणाने जेलरोड कोठारी कन्या शाळा येथूनच मुद्रणालयात यावे-जावे लागत आहे.राज्यात अनेक ठिकाणी लष्कर व केंद्र शासनाची सुरक्षितता व गोपनीयताबाबतची महत्त्वाची अनेक कार्यालये सुरू केली तेव्हा ती शहराच्या एका बाजूला कोपऱ्यात होती. मात्र शहराचा चोहोंबाजूने विकास झाल्याने केंद्र शासनाची ती कार्यालये लोकवस्तीमध्ये आलीआहेत.जिमखाना येथे अनेकजण फिरण्यासाठी, व्यायामासाठी येत असतात. गेट बंद असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या कोपºयापासून गोरेवाडी प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षांना विभागीय आयुक्त कार्यालय येथूूून वळून दूरवरून यावे-जावे लागत आहे.स्टाफ क्वॉर्टर येथील गोरेवाडी गेट गेल्या सहा महिन्यांपासून बंद केल्याने गोरेवाडी भागातील सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना लांबवरून यावे-जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. गोरेवाडी भागातील नागरिक वर्षानुवर्षे स्टाफ क्वॉर्टर येथील गोरेवाडी गेटमधूनच ये-जा करत होते. मुद्रणालय प्रशासन व कामगार नेत्यांनी यामध्ये लक्ष घालून गोरेवाडी गेट सुरु करावा. -संतोष साळवे, नगरसेवक

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी