शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपतींचे नव्हे गोेरगरिबांचे सरकार हवे : राहुल गांधी

By admin | Updated: October 10, 2014 22:39 IST

उद्योगपतींचे नव्हे गोेरगरिबांचे सरकार हवे : राहुल गांधी

 नाशिक : नरेंद्र मोदी यांचे भाजपा सरकार हे गोरगरीब जनतेसाठी नव्हे, तर केवळ श्रीमंत आणि उद्योगपतींसाठी आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील या गरीब आणि दुबळ्या जनतेने मतपेटीतून आपली ताकद भाजपा सरकारला दाखवा आणि महाराष्ट्रात पुन्हा गरिबांचेच सरकार आणा, असे आवाहन कॉँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले. कॉँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची वणी (तालुका दिंडोरी) येथे सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर चौफेर टीका केली. जनतेला स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यांचे सरकार गोरगरिबांसाठी नव्हे, तर उद्योगपतींसाठी आहे. कॉँग्रेसच्या काळात आधार योजनेद्वारे सरकारचा पैसा मनरेगा आणि अन्य योजनांतून अनुदानाच्या स्वरूपात थेट नागरिकांच्या खात्यात वर्ग केला जात होता. आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात जनतेचा पैसा थेट उद्योगपतींच्या खात्यात जमा होत आहे. महाराष्ट्राची आणि फुले, शाहू, आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांची जी विचारधारा होती तीच कॉँग्रेसची आहे. गोरगरीब जनतेला सुरक्षा आणि विकासात पुढे नेण्याचेच धोरण कॉँग्रेस सरकारच्या काळात राबविले गेले. दुष्काळात महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. आता कांदा उत्पादकांना निर्यातबंदीमुळे भाव कोसळल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कॉँग्रेस सरकारने ६ लाख लोकांना मोफत औषधे व आरोग्य सुविधा पुरविल्या. मोदी सरकारच्या काळात कर्करोग आणि मधुमेहाची हजाराच्या घरातील औषधे लाखात गेली आहेत. चीनच्या राष्ट्रपतींसोबत हिंदुस्थानात लडाखमध्ये चिनी सैन्यही घुसले. पाकिस्तानकडून भारतीय सैन्यावर गोळीबार सुरूच आहे. आधी अच्छे दिन आयेंगे म्हणणारेच आता ‘जल्दी सब ठीक हो जाएगा’ म्हणत आहेत. जनतेची फसवणूक करून सत्तेवर आलेल्यांना त्यांची जागा दाखवा आणि भाजपाला गोरगरीब व सर्वसामान्यांची ताकद दाखवून द्या, महाराष्ट्रात गरिबांचेच सरकार हवे, असे प्रतिपादन त्यांनी उपस्थिताना केले. यावेळी राहुल गांधी यांनी जिल्'ातील कॉँग्रेसच्या सर्व उमेदवारांची नावे वाचत त्यांना व्यासपीठावर बोलवित उपस्थित जनतेला त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.(प्रतिनिधी) इन्फो.. मोदी को आपको ही हटाना हंै उपस्थितांपैकी कार्यकर्त्यांनी ‘मोदी हटाव, मोदी हटाव’चा नारा दिल्यावर राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे पाहून ‘अब आपको ही मोदी को हटाना हंै’ असे सांगताच हशा पिकला.