शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बाप्पाला आज निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:21 IST

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे आगमन घरोघरी झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. सर्वत्र उत्साह व चैतन्य पहावयास मिळत होता.

नाशिक : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे आगमन घरोघरी झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. सर्वत्र उत्साह व चैतन्य पहावयास मिळत होता. गणेश भक्तांकडून सकाळ-संध्याकाळ आरती केली जात होती. चौकाचाकांमध्ये सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज रविवारी (दि.२२) अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत लाडक्या बाप्पाला भक्तांकडून भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे.  गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धतीने दुपारी १२ वाजता गणेश विसर्जन मिरवणूक वाकडी बारव येथून काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्याकडे सुमारे २१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केला आहे. विसर्जन मिरवणूक मार्गाची पोलिसांकडून पाहणी पूर्ण करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावरील सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्याच्या सूचना पोलिसांनी महापालिका, महावितरण विभागाला केल्या आहेत.रात्री उशिरापर्यंत भाविकांचा महापूरलाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी व सार्वजनिक गणेशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी मागील दोन दिवसांपासून शहरात भाविकांची गर्दी उसळत आहे. शुक्रवारीदेखील भाविकांच्या गर्दीने रस्ते फुललेले होते तसेच शनिवारी संध्याकाळी ७ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत शहरातील शालिमार, रविवार कारंजा, मेनरोड, भद्रकाली, पंचवटी, जुने नाशिक, कॉलेजरोड आदी भागात मंडळांचे देखावे बघण्यासाठी आबालवृद्धांची मोठी गर्दी लोटली होती.

टॅग्स :ganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव