शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर शुभेच्छांची धूम

By admin | Updated: October 31, 2016 01:34 IST

शुभेच्छा संदेश : फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर नेटिझन्सचे व्हिडीओ, ग्राफिक डिझाइन

नाशिक : दिवाळी उत्सवाला मांगल्याच्या आणि भरभराटीच्या शुभेच्छा देण्याची रीत आहे. हाच शुभेच्छांचा वर्षाव अन् दिवाळीचा रंग सोशल नेटवर्किंग साइट्सवरही अनुभवायला मिळत आहे. नेटिझन्सकडून नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यात येत आहेत. कोणी व्हिडीओतून तर कोणी संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. यंदा ‘ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मेट’ या फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपवरील नव्या सुविधांमुळे दिवाळीच्या शुभेच्छा खास दहा ते वीस सेकंदाच्या व्हिडीओमधून व्यक्त केल्या जात आहेत. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी संदेश पाठवून दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जावो, ही कामना करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोशल नेटवर्किंगच्या जगात नवे पर्याय आणि नवे फंक्शन उपलब्ध झाले आहेत. त्याचा वापर करून तरु णाई दिवाळीचा उत्साह व्यक्त करीत आहे. त्यात फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, इंस्टाग्रॅम, हाईक यांसारख्या साईट्सच्या माध्यमातून पाठविल्या जाणाऱ्या छोट्या व्हिडीओमुळे दिवाळी काहीशी खास बनली आहे. याच दहा ते वीस मिनिटांच्या व्हिडीओत दिवाळीचे महत्त्व, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी पहायला मिळत आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सवर घरच्या दिवाळीचे प्रत्येक क्षण न् क्षण शेअर केले जात आहेत. दिवाळीनिमित्त गावी गेलेले तरु ण-तरु णी ‘गावच्या दिवाळी’चे छायाचित्र आणि आठवणी शेअर करत आहेत, तर काहीजण दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य, त्यांनी केलेला पेहराव आणि कुटुंबीयांसोबत घालविलेल्या प्रत्येक क्षणाचा व्हिडीओ आणि छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करीत आहे. फेसबुकवर शुभेच्छा संदेश पाठविणाऱ्यांचीही कमतरता नाही. कोणी फराळाचे फोटो पोस्ट करीत आहे, तर कोणी आकर्षक पद्धतीने संदेश लिहून ते एकमेकांना पाठवीत आहेत. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्तेही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेकांना बेसुमार संदेश येत असल्याने त्यांच्या रंगाचा बेरंग होत आहे. (प्रतिनिधी)