शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गोणी लिलावाला विरोध : उमराणेत रास्ता रोको; पिंपळगाव येथे लिलाव पाडले बंद

By admin | Updated: July 26, 2016 21:49 IST

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

कळवण/उमराणे/पिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा सडू लागला असून, दुसरीकडे शासन धोरणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे परवाने परत केल्याने बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला असून, कांदा लागला सडू आणि शेतकरी लागला रडू अशी स्थिती सध्या शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासन धोरण आणि व्यापाऱ्यांच्या भूमिकेविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, कांदा गोणी लिलाव पद्धतीच्या निषेधार्थ उमराणे येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला, तर पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. कळवण येथे उद्या, बुधवारी (दि. २७) सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, गुरुवारी (दि. २८) कळवण बंदची हाक देण्यात आली आहे.जिल्ह्यातील बाजार समित्या १५ दिवसांपासून बंद असल्याने बाजार समितीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कांद्याचे बाजारभाव कधी वाढतील याची शाश्वती नसल्याने चाळीतील कांदा खराब होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा व्यापाऱ्यांची मनधरणी करून कांदा विक्रीसाठी व चांगल्या बाजारभावासाठी व्यापाऱ्यांचे उंबरठे झिजवित असून, गरज समजून मात्र शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.शासनाच्या धोरणामुळे व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे परवाने परत केले असल्याने बाजार समित्या बंद आहेत. समितीच्या आवारात गेल्या ११ जुलैपासून कांदा लिलाव बंद असल्याने कळवण तालुक्यात कांदा व्यापाऱ्यांकडून शिवार खरेदी सुरू करण्यात आली आहे. बाजारभाव नसल्याने भांडवल वसूल होईल या आशेने शेतकरी कांदा विक्री करत आहेत.कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. बाजारभाव नसल्याने शेतकरी बांधवांनी कांद्याची चाळीत साठवणूक केली असून, कांदा सडण्यास सुरुवात झाली आहे. अवकाळी पाऊस, हवामानातील बदल या सर्वांचा फटका तालुक्यातील कांदा उत्पादकांना बसला आहे. दरवर्षी उत्तमरीत्या टिकणाऱ्या कांद्याचे उत्पादन कळवण व लगतच्या तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात. गेल्या वर्षी बियाणात मोठ्या प्रमाणात फसवणूक व त्यामुळे डोंगळ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात झालेली वाढ तसेच अवकाळी पावसाचा फटका, वातावरणातील बदल यामुळे तालुक्यात कांदा उत्पादनात मोठी घट झाली होती. मात्र यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून कांदा चाळी बांधल्या. बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदे चाळीत साठवले. परंतु दिवाळीपर्यंत टिकणारा कांदा सध्या मोठ्या प्रमाणात सडू लागला आहे. (लोकमत ब्युरो)