शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे दुमाला परिसरात पूरस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:48 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, जानोरी, गोंदे दुमाला, कुºहेगाव, नांदगाव बुद्रुक आदी परिसरात आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेलगाव कुºहे येथील स्मशानभूमी पाण्यात गेली आहे. येथील भातशेतीदेखील पाण्याखाली गेली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेती व इतर पिकांचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देओंडओहोळ ओव्हरफ्लो : अस्वली, नांदूरवैद्य येथील नागरिकांचा घोटीशी संपर्कतुटला

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, जानोरी, गोंदे दुमाला, कुºहेगाव, नांदगाव बुद्रुक आदी परिसरात आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेलगाव कुºहे येथील स्मशानभूमी पाण्यात गेली आहे. येथील भातशेतीदेखील पाण्याखाली गेली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेती व इतर पिकांचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.इगतपुरीच्या पूर्व भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ब्रिटिशकालीन दारणा धरणसाठ्यात वाढ होत आहे. दारणा नदीपात्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील मुख्य पीक असलेले भातपीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी भयभीत झाला असून, परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोंदे दुमाला परिसरातदेखील पूरजन्य स्थिती असून, महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटल्यामुळे दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहत परिसरातदेखील पावसाने कहर केला असून, येथील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जोरदार पावसामुळे येथील दशक्रि या हॉलमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिसरातील ममहामार्गालगत असलेल्या आनंदवन सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व इगतपुरी प्रशासन सज्ज आहे.नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे. धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित प्रशासनाची मदत घ्यावी, असे आवाहन इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी केले आहे. भातशेती पाण्याखाली इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर असल्यामुळे तालुक्यात सध्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या जोरदार पावसामुळे येथील मुख्य पीक भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर प्रशासनाने नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी करून तातडीने पंचनामे करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.