पंचवटी : कोणार्कनगर येथील बंद सदनिकेचा कडीकोयंडा तोडून चोरटयांनी तिजोरीतील सोन्याचांदीचे दागिने तसेच रोकड असा ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी कुलश्री अपार्टमेंटमधील रहिवासी हेमंत नामदेव मोरे यांनी आडगाव पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. मोरे हे कुलूप लावून कामानिमित्ताने गेले असता त्यावेळी चोरट्यांनी बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व तिजोरीत ठेवलेले ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने तसेच पाच हजार रुपयांची रोकड असा ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. (वार्ताहर)
सोन्याचांदीचे दागिने, ऐवज चोरून नेला
By admin | Updated: September 28, 2014 00:38 IST