शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सोने खरेदीचे व्यवहार झाले सुलभ

By admin | Updated: July 14, 2017 01:23 IST

नाशिक : सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर जीएसटी वाढला असला तरी व्यवहारात सुलभता आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर पूर्वीपेक्षा केवळ एक टक्का जीएसटी वाढला असला तरी आता ग्राहकांसाठी व्यवहारात सुलभता आली असल्याने सराफी व्यावसायिक व ग्राहक या दोघांनाही फायदा होणार आहे. प्रत्येक सराफी पेढीतील बदलते नियम आता ग्राहकांच्या वाट्याला येणार नसून, एकसमानता अनुभवता येणार आहे. सराफी व्यावसायिकांचीही या कायद्यामुळे कागदपत्रांच्या जंजाळातून सुटका झाली आहे. त्यामुळे सराफी बाजारातील वातावरण पूर्वीप्रमाणेच स्थिर असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सोन्या-चांदीचे दागिने, वस्तूवर सरसकट ३ टक्के जीएसटी जाहीर करण्यात आला असून, यापूर्वी ग्राहकांना सोन्याचा दागिना खरेदी केल्यानंतर सोन्याचा भाव, मजुरी, व्हॅट, एक्साईज ड्युटी, एलबीटी आदी सर्व गोष्टी वेगवेगळ्या द्याव्या लागत होत्या. त्याऐवजी सोन्याचा चालू भाव, मजुरी आणि जीएसटी इतक्याच हेडखाली आता ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहे. इतर वस्तू व सेवांच्या तुलनेत सोन्या-चांदीवर जाहीर केलेला जीएसटी अत्यल्प असल्याने या क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला असल्याची भावना सराफी व्यावसायिक व ग्राहक दोघांनीही व्यक्त केली आहे.