शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

गोडसे, चव्हाण घेणार मराठीतून शपथ

By admin | Updated: May 22, 2014 22:18 IST

नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे हेवीवेट उमेदवार छगन भुजबळ यांच्यावर मात करत जायंट किलर ठरलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि ..

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे हेवीवेट उमेदवार छगन भुजबळ यांच्यावर मात करत जायंट किलर ठरलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून हॅट्ट्रिक साधणारे भाजपाचे हरिश्‍चंद्र चव्हाण हे खासदारकीची शपथ मराठीतून घेणार आहेत. दरम्यान, पुणे येथील भारत विश्‍व ज्ञानपीठम्चे कुलपती डॉ. विजय भटकर आणि शारदा ज्ञानपीठम्चे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना संस्कृतमधून शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. सोळाव्या लोकसभेचा कालावधी ३१ मे रोजी संपुष्टात येत असून, त्यापूर्वी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पूर्ण करावा लागणार आहे. २६ मे रोजी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होणार असून, त्यानंतर २७ मेपासून नव्या लोकसभेच्या कामकाजास सुरुवात होणार आहे. पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम राबविला जाणार असल्याने नवनिर्वाचित खासदारांकडून ते कोणत्या भाषेत शपथ घेणार याबाबतचे पत्र राष्ट्रपती कार्यालयाकडून भरून घेतले जात आहे. त्यानुसार नाशिकचे नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली जाणार असल्याचे 'लोकमत'शी बोलताना सांगितले. दरम्यान, पुणे येथील भारत विश्‍व ज्ञानपीठम्चे कुलपती डॉ. विजय भटकर व शारदा ज्ञानपीठम्चे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित खासदारांना पत्र पाठवून संस्कृत भाषेत शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. १९९१ मध्ये लोकसभेचे सभापती बलराम जाखड यांच्यासह ५३ सदस्यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली असून, यंदाही जास्तीत जास्त खासदारांनी संस्कृतमधून शपथ घ्यावी, यासाठी शारदा ज्ञानपीठम्चे प्रबंध संपादक वासुदेव डोंगरे स्वत: शपथविधीच्या सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून खासदारांना विनंती करणार आहेत. (प्रतिनिधी)