शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठाची शेती पाण्याखाली

By admin | Updated: August 8, 2014 00:57 IST

गोदाकाठाची शेती पाण्याखाली

 कसबे सुकेणे : गोदावरी व दारणा धरणातून विसर्ग करण्यात आलेल्या पूरपाण्यानंतर नांदूरमधमेश्वर धरणाचे दरवाजे उशिरा उघडल्यामुळेच गोदाकाठची संपूर्ण शेती पुराच्या पाण्याखाली गेली, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, असल्याचा आरोप चांदोरी व गोदाकाठच्या ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या दारणा व गंगापूर धरण व दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी, दारणा व बाणगंगा या नद्यांना मोठा पूर आला होता. दारणा व गंगापूर धरणातून एकाचवेळी करण्यात आलेल्या विसर्गामुळे चांदोरी सायखेड्यासह गोदाकाठावर पूरपरिस्थती निर्माण होऊन द्राक्षबागा व पिके पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, या पूरपरिस्थितीला गंगापूर, दारणा व नांदूरमधमेश्वर धरणाच्या प्रशासनाच्या असमन्वय जबाबदार असून नांदूरमधमेश्वर धरणाचे दरवाजे उशिरा उघडल्याने गोदेच्या पुराचा फुगवटा हा गोदाकाठाच्या चाटोरीपर्यंत राहिला. त्यामुळे काठालगतची शेती पुराच्या पाण्याखाली गेली असल्याचे चांदोरी येथील सुरेश भोर यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी करून तसेच प्रतिकुल हवामानावर मात करीत या भागात द्राक्षबागा जगविल्या असताना पाटबंधारे जलसंपदा खात्याच्या परस्पर असमन्वयामुळेच गोदाकाठावर पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याचे सुरेश भोर, चांदोरीचे उपसरपंच पुष्कर हिंगणे, मधुकर भोर, सोमनाथ गडाख, बाळू शेटे आदिंसह चांदोरी, चाटोरी, सायखेडा, शिंगवे, नागापूर भागातील शेतऱ्यांनी केली आहे. बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मौजे सुकेणे शिवारातही शेतीचे नुकसान झाले आहे. मौजे सुकेणे गावाच्या शिवारात असलेल्या बाणगंगा नदीवरील वसंत बंधारा पुरामुळे वाहून गेला आहे. शासनाने हा बंधारा पुन्हा बांधून परिसरातील जलसिंचनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही मौजे सुकेणेचे उपसरपंच विजय मोगल व ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली आहे.जलसंपदा विभागाच्या गलथान प्रशासकिय असमन्वयामुळे गोदाकाठावर मानव निर्मीत पुरपरिस्थीती निर्माण झाली आहे. शेतक-यांचे लाखोंचे नुकसान झाले असुन शासनाने गोदाकाठाच्या पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. - सुरेश भोर, शेतकरी , चांदोरी बाणगंगेला आलेल्या पुरामळे मौजे सुकेणे गावाच्या शिवारातील वसंत बंधारा वाहुन गेला आहे. त्यामुळे शेकडो क्युसेक पाणी वाहुन जात असुन शासनाने हयाठिकाणी नवा बंधारा बांधण्याविषयी पाउले उचलावी. - विजय मोगल, उपसरपंच मौजे सुकेणे