शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोदापात्रात सरसकट कॉँक्रीट घाट नको

By admin | Updated: June 29, 2014 00:48 IST

हेमंत गोडसे : गोदाघाट सुशोभीकरण व पर्यटनाच्या दृष्टीने हवा ‘लॅन्डस्केप’

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून गोदापात्रात एका बाजूने सुमारे बाराशे मीटरचा सरसकट कॉँक्रीटचा घाट बांधला जात आहे हे अत्यंत चुकीचे असून, केवळ कुंभमेळ्यापुरता घाटाचा विचार न करता प्रशासनाने कायमस्वरूपी या घाटाला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित कसे करता येईल व गोदापात्रात कॉँक्रीटचे जंगल आगामी काळात पर्यटकांना दिसणार नाही, याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी पाहणी दौऱ्याप्रसंगी सांगितले.कुंभमेळ्याच्या औचित्यावर येणारे लाखो भाविक दक्षिणगंगा अर्थात गोदावरीत स्नान करतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी नदीपात्रात टाळकुटेश्वर पुलापासून थेट गोदावरी-कपिला संगमापर्यंत व त्यापुढे टाकळी गावाजवळ गोदा-नासर्डी (नंदिनी) संगमापासून पुढे चारशे मीटर म्हणजेच सुमारे एक हजार सहाशे मीटर लांबीचा आणि वीस मीटर रुंदीचा कॉँक्रीट घाट सरसकट बांधण्यात येणार आहे. यामुळे नदीपात्रात कायमस्वरू पी कॉँक्रीट तपोवन बघण्यासाठी सातत्याने येणाऱ्या पर्यटकांच्या नजरेस पडेल. या घाटावरती कुंभमेळा आटोपल्यानंतर होणारे गैरप्रकार पोलीस यंत्रणेबरोबर मनपासाठीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात घाट बांधताना तो ठिकठिकाणी खंडित (पंक्चर) करावा व त्या जागेमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने व नाशिकची प्रतिमा उंचविण्यासाठी उत्कृष्ट पद्धतीने नैसर्गिक रमणीय भूप्रदेश साकारला जाऊ शकतो व त्या दृष्टीने मी प्रयत्नशील असल्याचे गोडसे यांनी यावेळी सांगितले. लवकरच याबाबत लॅण्डस्केप निर्मितीकारांकडून आराखडा मागविणार असून मनपा, जलसंपदा, जिल्हा प्रशासन यांच्या आगामी संयुक्त बैठकीमध्ये तो सादर करणार असल्याचे गोडसे म्हणाले. संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन पर्यटन व गोदापात्र सुशोभीकरणासाठी घाटाचा उपयोग कसा करून घेता येईल, याविषयीची चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी ‘आपलं पर्यावरण नाशिक समूहा’ला दिले. यावेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, पूर्व प्रभाग सभापती कुणाल वाघ, शेखर गायकवाड, दीपक जाधव, जलसंपदाचे सागर शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)