शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

देवरगावी रंगला पालखी सोहळा

By admin | Updated: July 11, 2014 00:48 IST

देवरगावी रंगला पालखी सोहळा

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. चांदवड तालुक्यातील देवरगावी श्री हरेकृष्ण महाराज यांच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते. जिल्ह्यातील मनमाड, मालेगाव, चांदवड, कळवण येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मनमाड : येथील आठवडे बाजारातील बालाजी विठ्ठल मंदिर, विठ्ठल रुख्मिणी मंदिर आदिंसह विविध मंदिरांत धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी भाविकांची गर्दी होती.श्री विठ्ठलाची महाअभिषेक पूजा, महाआरती, दुपारी रथयात्रा तसेच श्री विठ्ठलाची पालखी, दिंडी सोहळा व भजन आदि कार्यक्रम झाले. आठवडे बाजारातील श्री बालाजी विठ्ठल मंदिरातून टाळ-मृदंगाच्या गजरात पांडुरंगाची रथयात्रा काढण्यात आली. विठ्ठल मंदिरातही पूजा होऊन पारंपरिक पद्धतीने स्वतंत्ररीत्या पालखी काढण्यात आली. कलावती आई मंदिरात व शिवाजीनगरातील संत गजानन महाराज मंदिरात आषाढी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. चांदवड : येथील आबड लोढा- जैन महाविद्यालयात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यावेळी मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. एच. जैन होते.कविवर्य खलील मोमीन यांनी सांगितले की, संत साहित्य हे सत्य, शिव व सुंदर यासारख्या मानवी मूल्यांनी संपन्न आहे. पिंपळगाव बसवंत : चांदवड तालुक्यातील देवरगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा जमला होता. चांदवड तालुक्यातील प्रतिपंढरपूर समजले जाणारे श्रीक्षेत्र देवरगावी श्री हरेकृष्ण महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली होती. सकाळी प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते पंचधातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. दुपारी १ वाजता पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण उभे रिंगण, सांप्रदायिक खेळ, रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता.सुजित महाराजांनी यावेळी शिस्तबद्ध पद्धतीने पालखी सोहळ्याचे नियोजन केले होते. वडनेरभैरव, चांदवड पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. (लोकमत चमू)