शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

गोदावरीतील पाणवेली काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:10 IST

ऐन उन्हाळ्यात गोदावरी नदीपात्रात सायखेडा येथून चाटोरीपर्यंत जवळपास दोन किलोमीटर अंतरावर पसरलेल्या पाणवेली प्रशासनाने तातडीने काढाव्यात, असे आदेश आमदार अनिल कदम यांनी जलसंपदा विभागाला दिले. आमदार कदम यांनी गोदावरी नदीवरील पसरलेल्या पाणवेलींची पाहणी केली.

सायखेडा : ऐन उन्हाळ्यात गोदावरी नदीपात्रात सायखेडा येथून चाटोरीपर्यंत जवळपास दोन किलोमीटर अंतरावर पसरलेल्या पाणवेली प्रशासनाने तातडीने काढाव्यात, असे आदेश आमदार अनिल कदम यांनी जलसंपदा विभागाला दिले. आमदार कदम यांनी गोदावरी नदीवरील पसरलेल्या पाणवेलींची पाहणी केली. यावेळी जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली. येत्या दोन दिवसांत पाणवेली काढण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे खेडकर यांनी कदम यांना सांगितले.  सायखेडा परिसरात अनेक दिवसांपासून गोदावरी नदीपात्रात चाटोरी गावाच्या जवळपासदोन किलोमीटर अंतरापर्यंत पाणवेली पसरलेल्या आहेत. पाणवेलीने गोदावरीचे पाणी दुषित झाल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडलेआहेत. परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणवेली एकाच ठिकाणी अडकल्याने पाण्याचा प्रवाह थांबला असून, दुर्गंधी पसरली  आहे. अनेक साथीचे रोग  पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  आमदार कदम यांनी भेट देऊन पात्राची पाहणी करून प्रशासनाला आदेश दिले. कटर आणि जेसीबीच्या साह्याने पाणवेली काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.  यावेळी महेंद्र जाधव, शरद कुटे, श्याम जोंधळे, भाऊसाहेब कमानकर, सुरेश खैरनार, अंबादास जामकर, सोमनाथ शिंदे, बाळू चारोस्कर, संजय दाते, खंडू बोडके, नरेंद्र डेर्ले, बाळासाहेब कानडे, साहेबराव डेर्ले, दत्तू भुसारे, ज्ञानेश्वर पोटे, शहाजी राजोळे, राजेंद्र राजोळे, नंदू राजोळे यांसह नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :godavariगोदावरी