शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी प्रदूषण निर्मूलनासाठी  ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:04 IST

गंगा, गोदावरी आणि यमुना यांसह देशभरातील नद्यांच्या जलप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना नाशिकमधील देवळाली येथील केंद्रीय विद्यालयातील आठवीच्या दोन विद्यार्थिनींनी ‘वेस्ट टू वेल्थ’ या शोध प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी प्रदूषण नियंत्रित करण्याची संकल्पना मांडली

नाशिक : गंगा, गोदावरी आणि यमुना यांसह देशभरातील नद्यांच्या जलप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना नाशिकमधील देवळाली येथील केंद्रीय विद्यालयातील आठवीच्या दोन विद्यार्थिनींनी ‘वेस्ट टू वेल्थ’ या शोध प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी प्रदूषण नियंत्रित करण्याची संकल्पना मांडली असून, ही संकल्पना राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या २७व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत मांडण्यासाठीही त्यांची निवड झाली आहे.देवळाली येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक एकच्या विद्यार्थिंनी पूजा. सी. व्ही व आकांक्षा देशमुख यांनी २७ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेअंतर्गत प्रादेशिक स्तरावर पुणे ३० आॅक्टोबर येथे झालेल्या स्पर्धेत गोदावरीच्या जलप्रदूषणाचे सर्वेक्षण करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासोबतच त्यातून निर्माण होणाºया कचºयाचे संकलन करून त्यातून टिकाऊ उत्पादन घेण्याविषयीच्या संकल्पना मांडल्या आहेत. या प्रकल्पात पूजा आणि आकांक्षा यांनी गोदावरीच्या जलपात्रातून संकलित होणाºया प्लॅस्टिकच्या कचºयावर अधिक लक्ष केंद्रित केले असून, अशा प्लॅस्टिक कचऱ्यांचे संकलून करून त्यापासून रेल्वे रुळांचे स्लीपर तयार करण्यासारखे विविध औद्योगिक उत्पादनांची निर्मिती शक्य असल्याची संकल्पना मांडली आहे. त्यांच्या संकल्पनेतील नावीण्यता आणि सखोल अभ्यास या पार्श्वभूमीवर परीक्षकांनी प्रादेशिक स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर होणाºया बालविज्ञान परिषदेत त्यांची संकल्पना मांडण्यासाठी निवड केली आहे. त्यामुळे पूजा आणि आकांक्षा दोघींनीही २७व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत त्यांचा शोधप्रकल्प मांडण्यासाठी तयारी सुरू केली असून, त्यासाठी त्यांच्याकडून गोदावरी काठच्या नागरिकांकडून जलप्रदूषणासह अन्य समस्यांची माहिती घेण्यासोबतच कचºयाचे प्रमाण अणि अन्य बाबींविषयी आणखी सखोल अभ्यासाला सुरुवात केली आहे.

टॅग्स :godavariगोदावरीStudentविद्यार्थी