शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकची गोदावरी मृत्युशय्येवर

By admin | Updated: August 8, 2014 02:09 IST

नाशिकची गोदावरी मृत्युशय्येवर

 

नाशिक : नाशिकची गोदावरी नदी ही पूर्वी आजारी होती, ती आता मृत्युशय्येवर आहे. गोदावरी जर मृतप्राय झाली तर नाशिककरांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देतानाच जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी, गोदावरीचे प्रदूषण थांबवायचे असेल तर नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी थांबवून त्याचा वापर शेती-उद्योगासाठी करण्याचा सल्ला दिला. किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज स्मारकात वसुंधरा महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी आगामी कुंभमेळ्याविषयी विचारमंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेंद्रसिंह यांनी सांगितले, गोदावरी नदी स्नानायोग्य राहिली नसून ती नाला बनली आहे. कुंभमेळ्याला वैज्ञानिक आधार आहे. पर्वणी काळात सूर्य सिंह राशीत जात असल्याने त्यावेळी आॅक्सिजनचे प्रमाण वाढलेले असते. त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी राजा, प्रजा व ऋषीमुनी एकत्र येत असत आणि विचारांचे आदानप्रदान करत असत. परंतु आता कुंभमेळ्याला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. अंधविश्वास वाढला आहे. महापालिकेने गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी खूप खर्च केला असला तरी सांडपाणी विसर्जनाची व्यवस्था वेगळी केली नाही तर कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. गोदावरी नदीवर बनविले जाणारे घाटही नदीतील नैसर्गिक रचनेला धोकादायक ठरत आहेत. गोदावरी किनारी पिंपळवृक्ष, कदंब, निंब आदि वृक्षांची लागवड केल्यास पाणीशुद्धीकरणासाठी त्याची मदत होऊ शकेल. नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा वापर शेती व उद्योगासाठी करण्याचा सल्लाही डॉ. राजेंद्रसिंह यांनी दिला. यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक सचिन महाजन, भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, गोविंद माळी, राजेश पंडित, अमृता पवार यांनी सहभाग घेतला. वसंधुरा क्लबचे वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)