त्र्यंबकेश्वर : गोदावरीत मलजल मिसलळे जाते ते होते आणि गोदावरी प्रदुषित होत होती. याविरुद्ध ललित शिंदे, विवेक पंडीत आणि निशिकांत पगारे यांनी हरित लवादाकडे धाव घेतली होती. त्यानंतर गोदावरीचे पवित्रजल व गावजल मलजल वेगवेगळे करण्याचा आदेश दिला. त्या आदेशास गेल्या दिवसापासून युद्ध पातळीवर सुरुवात होऊन एप्रिल अखेर रस्त्यासह काम पूर्ण होईल असा संबंधित ठेकेदाराने विश्वास व्यक्त केला आहे. या कामामध्ये गोदावरी मिसणारा म्हातार ओहळ व नीलगंगा यांचे पाणी वेगळे केले असून ते मलजल वाहिनीत जमा केले आहे. तर गावातील सर्व सांडपाणी देखील मलजल वाहिनीतच एकत्र होईल. ही मलजलवाहिनी गोदावरी पात्रातून वेगळी करुन वेगळा मार्ग काढून दिला आहे. जोपर्यंत गोदावरीतून मलमजल वेगळे होत नाही तोपर्यंत रस्त्याचेही काम पूर्ण होत नव्हते. तर दुसरीकडे पाचआळी विभागात देखील मलजल वाहिनी अहिल्या नदीच्या भिंतीला लागून स्वतंत्ररित्या टाकण्यात आली आहे. म्हणजे अहिल्या नदीच्या पाण्याचा व मलजल वाहिनीच्या पाण्याचा काहीही संबंध नाही. अहिल्यानदी वरील हे काम आहे. त्यामुळे अहिल्यानदी खऱ्या अर्थाने शाप मुक्त झाली असून आता अहिल्या नदीचा व प्रदुषणाचा काहीही संबंध राहिलेला नाही. तर गोदावरीला देखील प्रदुषणाचा विळखा बसला आहे. तो विळखाही हरित लवादाच्या आदेशन्वये मोकळा होत आहे. वरील तिनही याचिकाकर्ते यांचा नाही म्हटले तरी विजय झाला आहे. याशिवाय नदीपात्रात कोणतेही सिमेंटचे काम न करता फक्त घाट बांधण्यापुरते सिमेंटचे काम करण्यात आले आहे. याशिवाय घाटांचे काम पूर्ण होत आले आहे आणि अहिल्या या दोन्हीही नद्या आता प्रदुषण मुक्त वाहणार आहेत. गोदावरी नदीतील मलजल वाहिनी स्वतंत्र काढण्याचे व फक्त गोदावरीचे जल स्वतंत्ररित्या करण्याचे काम ५२ रुपये लक्ष रुपयांचे आहे. ही दोन्हीही कामे रजपूत नामक ठेकेदार करीत आहे. एकूण १ कोटी १० लक्ष रुपयांचे हे काम आहे.
गोदावरी माता आता प्रदुषण मुक्त होणार
By admin | Updated: April 6, 2015 00:50 IST