शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठ भागातील रस्ते खड्ड्यात

By admin | Updated: October 17, 2016 01:24 IST

साइडपट्ट्यांची दुरवस्था : तालुक्याच्या सीमेवरील गावे दुर्लक्षित; बांधकाम विभाग सुस्त

सायखेडा : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने गोदाकाठ भागातील रस्त्यांची पूर्ती वाट लागली आहे. यंदा पाऊस चांगला झाला. सततच्या पावसामुळे परिसरातली रस्ते खचले आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.निफाड तालुक्यात खासदार-आमदार निवडणुकीसाठी दिंडोरी-निफाड असे विभाजन होते. पण ज्या गावांचे विभाजन होते त्या गावांचा निवडणुकीनंतर विसर पडत असल्याने इकडे आड तर तिकडे विहीर अशी काहीशी परिस्थिती येथील प्रवाशी, वाहनधारक, ग्रामस्थांची होते. अशीच काहीशी परिस्थिती तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गावांची आहे. तालुक्याच्या सीमेवरील गावांना तर कोणी वालीच राहिला नसून फक्त निवडणुकांसाठीच या गावांचा वापर होतो का, असा प्रश्न वाहनधारक, नागरिकांना पडला आहे. निफाड तालुक्यातील बहुतांशी गावातील रस्ते एकपदरी त्यात खड्डे, साईटपट्टयांना मोठमोठे खड्डे पडले असून अवजड वाहनधारक रस्त्याच्या खाली उतरत नसल्याने वाहनधारकांत नित्याचीच बाचाबाची होते. अनेकदा दुर्घटना घडल्याच्या घटना ताज्या आहेत. छोटे-मोठे अपघात तर नित्याचेच झाले आहेत. बांधकाम विभाग या संदर्भात कोणतेही पाऊल उचलत नाही. शिवाय लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत असल्याने वाहनधारक, प्रवाशी, ग्रामस्थाना अडचणीना सामोरे जावे लागते. निवडणुकांच्या प्रचारासाठी याच रस्त्यांचा वापर होतो पण निवडणूक झाल्यानंतर सर्वांनाच रस्त्यांचा विसर पडत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. राज्य महामार्ग क्र मांक ३५ सुरत- शिर्डी रस्त्यावर ओझरपासून भेंडाळीपर्यंत खड्डेच खड्डे पडले आहेत. जवळपास २५-३० किमीच्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. खेरवाडी ते ओझर पर्यंत रस्ता असून नसल्या सारखा झाला असून रस्त्यावरील डांबरीकरण पुर्णता उखडून गेले. राष्ट्रीय अन् राज्यमार्गाला जोडणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने रस्त्यातील खडी वर आल्याने वाहानधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. (वार्ताहर)