शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

..पण मंदिरात देवच नाही

By admin | Updated: May 8, 2016 00:13 IST

नांदगाव पंचायत समिती : पंचायतराज समिती सदस्यांच्या भावना

नांदगाव : तालुक्यात पंचायत समितीची देखणी इमारत म्हणजे मंदिर आहे, मात्र या ठिकाणी देवच नसल्याची भावना तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायतराज त्रिसदस्यीय समितीच्या पथकाने व्यक्त केली. कामकाज आटोपल्यानंतर सभापती कमलताई सोनावणे यांच्या दालनात समितीचे सदस्य आमदार उन्मेष पाटील, नागपूरचे आमदार हेमंत पाटील, नांदेडचे आमदार विकास कुंभारे यांनी पत्रकारांशी अनोपचारिक गप्पा मारताना आपल्या भावना व्यक्त केल्या. पंचायतींचे बळकटीकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा दावा करताना आमदार त्रयींनी जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या तालुक्यात पंचायत स्तरावर विभाग प्रमुखांची असलेली वानवा व आस्थापनेवरची रिक्त पदे त्यामुळे लोकाभिमुखता कशी होणार या प्रश्नावर सकारात्मकता दर्शवित आमदार उन्मेष पाटील यांनी योजना राबविताना पदाधिकाऱ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले. आम्हाला चार तालुके दिल्याने नांदगावपर्यंत पोहचण्यास झालेल्या उशिरामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या समस्या समजून घेता आल्या नसल्याची खंत आमदार पाटील यांनी व्यक्त केली. शालेय पोषण आहार, पेयजल योजनेबाबत असलेल्या अडचणी समितीच्या निदर्शनास आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, एरवी सायंकाळी पाचच्या सुमाराला तालुका पंचायत समितीत फारसे कुणी उपस्थितीत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्र वारी मात्र पंचायतराज समिती येणार म्हणून रात्री उशिरापर्यंत कधी न लागलेल्या दिवाबत्तीचा उजेड खूप काही सांगून जाणारा ठरला. येवल्याहून रात्री पावणेनऊ वाजता पथकाचे आगमन झाले. त्यानंतर सभागृहात स्वागताचा सोहळा संपल्यावर कामकाजाला प्रारंभ झाला. कक्ष अधिकारी सचिन बाभळगावकर, प्रतिवेदक अरु ण भोंगे, प्रशासन अधिकारी राजाराम दिघे आदिंचा पथकात समावेश होता. पंचायतराज समितीचे सदस्य आमदार उन्मेश पाटील यांनी समितीच्या दौऱ्याचा उद्देश सांगितला. पंचायतराज समिती उलटतपासणीला नव्हे तर माहिती घेण्यासाठी आल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे कोणीही असत्य माहिती देऊ नये, सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कक्ष अधिकारी बाभळगावकर यांनी साक्षीचे नियम व समिती हक्काचे वाचन केले. समितीचे कामकाज गोपनीय असल्याने गटविकास अधिकारीवगळता पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगून प्रश्नावलीचे वाचन करण्यात आले. (वार्ताहर)