शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शंभर दिवसांत १४७ कार्यक्रमांचे लक्ष्य

By admin | Updated: August 30, 2016 02:11 IST

विजया रहाटकर : राज्य महिला आयोगाच्या विभागीय कार्यशाळेत निर्णय

नाशिक : राज्य महिला आयोगातर्फे शंभर दिवसांत १४७ कार्यक्रम घेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, राज्यात महिल्यांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सुजाण समाज निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन केले असल्याचे प्रतिपादन महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले. आयएमए सभागृहात राज्य महिला आयोेग विभागीय कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे, गयाताई कराड, अ. ना. त्रिपाठी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण अंकुश शिंदे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रा. शोभा शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. देवेंद्र राऊत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अधिक माहिती देताना रहाटकर यांनी सांगितले की, मिशन १४७ अंतर्गत कार्यशाळा, जनजागृतीपर कार्यक्रम यांचा समावेश आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या कायद्याबरोबरच मनापासून, कृतीतून त्याची अंमलबजावणी व्हायला हवी यासाठी महिलांसाठी काम करणाऱ्या सर्व समुपदेशकांना भर देण्यात येणार आहे. महिला आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात येणे अडचणीचे ठरत असल्याचे जाणवल्याने आयोगच महाराष्ट्र दौऱ्यावर निघाला असून, त्याअंतर्गत आजपर्यंत औरंगाबाद, नांदेड, कोकण, कोल्हापूर, नाशिक येथे दौरे झाले आहेत. केवळ मुंबईचाच दौरा आता शिल्लक असून, महिला आयोगाकडील जास्तीत जास्त तक्रारींचा निपटारा करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या एकदिवसीय कार्यशाळेत डॉ. शोभा शिंदे, अ‍ॅड. मीनल कोहर, सोलापूर येथील प्रयास संस्थेच्या देवयानी टुम्मा आदिंनी ‘लिंग समभाव व संवेदनशीलता’, ‘महिला विषयक कायदे’, ‘कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा’ या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. गटचर्चेने कार्यक्रमाचा समारोप झाला. (प्रतिनिधी)