शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 01:07 IST

नाशिक : आर्थिक अनियमितता व गैरव्यवहाराच्या कारणावरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याच्या सहकार खात्याच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी बाजार समितीच्या संचालकांनी केली असून, राज्य सरकार व पर्यायाने सहकारमंत्र्यांच्या आदेशानेच सदरची कारवाई झाल्यामुळे या लढाईत राजकीय हस्तक्षेपाऐवजी कायदेशीर लढाईलाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देबाजार समिती बरखास्त : राजकीय हस्तक्षेपाऐवजी कायदेशीर लढाईला प्राधान्य राजकीय हस्तक्षेपाऐवजी कायदेशीर लढाईलाच प्राधान्य

नाशिक : आर्थिक अनियमितता व गैरव्यवहाराच्या कारणावरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याच्या सहकार खात्याच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी बाजार समितीच्या संचालकांनी केली असून, राज्य सरकार व पर्यायाने सहकारमंत्र्यांच्या आदेशानेच सदरची कारवाई झाल्यामुळे या लढाईत राजकीय हस्तक्षेपाऐवजी कायदेशीर लढाईलाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या दहा कारणांवरून बरखास्त करण्यात आली, त्यातील बहुतांशी मुद्दे हे गेल्या दहा ते बारा वर्षांपासूनचे आहेत. त्यामुळे सहकार खात्याने त्याचवेळी ही कारवाई का केली नाही, असा सवाल विद्यमान संचालक मंडळ करू लागले आहे. राज्य कृषी पणन महामंडळाचे थकीत कर्ज, राज्य सहकारी बॅँकेचे थकीत कर्ज, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी थकीत, बाजार समितीतून निलंबित केलेल्या कर्मचाºयांसाठी नेमलेल्या वकिलाच्या फीपोटी केलेला खर्च, न्यायालयीन लढ्यातील वकील शुल्काचा बाजार समितीवर बोजा, अनावश्यक कर्मचाºयांची नेमणूक अशा आर्थिक बाबींशी निगडित असलेल्या कामकाजात बाजार समितीने हलगर्जीपणा तसेच अनियमितता केल्याप्रकरणी सहकार खात्याकडून चौकशी सुरू होती. त्यानुसार जून २०१७ मध्येच जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या संचालकांना बाजार समिती बरखास्त का करू नये, अशा आशयाची नोटीस बजावली होती. या नोटिसीत उपरोक्त दहा मुद्द्यांचा समावेश करण्यात आला होता.जिल्हा निबंधकांनी दिलेल्या नोटिसीविरुद्ध बाजार समितीने उच्च न्यायालयात धाव घेऊन सहकार खात्याच्या नोटिसीला स्थगिती देण्याची मागणी केली, त्याच बरोबर १९९५-९६ पासून सुरू असलेल्या आर्थिक अनियमिततेची त्याचवेळी चौकशी न करता विद्यमान संचालक मंडळाला दोेष देणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने संचालकांची बाजू ऐकून घेत, सहकार खात्याने बरखास्तीची कारवाई केल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्यासाठी संचालकांना पंधरा दिवसांचा अवधी देत असल्याचा निर्णय त्याचवेळी दिला. त्यामुळे सहकार खात्याने गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी संचालक मंडळाने केली आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी संचालकांनी मुंबईला जाऊन विधिज्ञांशी चर्चा केली, तसेच कागदपत्रांची जुळवाजुळव पूर्ण झाली असून, चालू आठवड्यात अपील दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, बरखास्तीनंतरही संचालक मंडळ बाजार समितीच्या कामकाजात भाग घेत असल्याचे वृत्त आहे. राजकीय हस्तक्षेप नकोराज्य सरकारनेच बाजार समिती बरखास्त केल्यामुळे राजकीय हस्तक्षेपाने हा प्रश्न सुटणार नाही. सहकारमंत्र्यांच्या आदेशामुळेच जर बाजार समिती बरखास्त झाली असेल तर अशावेळी पालकमंत्री असो की सहकारमंत्री यांची भेट घेऊन बरखास्ती मागे घेता येत नाही. त्यामुळे कायदेशीर लढाई कायदेशीर मार्गानेच लढविली जाणार आहे.- संजय तुंगार, संचालक, बाजार समिती