शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कडवाची वीजवाहिनी टाकण्यासाठी सात दिवसांत पर्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 18:27 IST

सिन्नर : शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी कडवा धरणातून जवळपास ८२ कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे. ...

ठळक मुद्देमाणिक कोकाटे: साकुर फाटा येथे स्थानिकांसमवेत बैठक

सिन्नर : शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी कडवा धरणातून जवळपास ८२ कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे. तथापि साकुर फाट्यावरील सव्वा दोन कि.मी. अंतरातील वीज वाहिनी टाकण्यास स्थानिकांचा विरोध असल्याने पूर्ण क्षमतेने पंपिंग करता येत नाही. परिणामी शहराचा पाणीप्रश्‍न कायम आहे. स्थानिक शेतकरी आणि व्यावसायिकांनी या योजनेसाठी टाकावयाची वीजवाहिनी नेमकी कुठून आणि कशी टाकायची याबाबत ७ दिवसात पर्याय द्यावा अन्यथा शासकीय नियमानुसार वीजवाहिनी टाकून पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल येईल, असा इशारा आमदार माणिक कोकाटे यांनी दिला.कडवा पाणीपुरवठा योजनेचे काम पुर्ण होऊनही केवळ साकुर फाट्यावरील स्थानिकांच्या विरोधामुळे सव्वा दोन कि.मी. अंतरावरील विजवाहिनीचे काम पुर्ण न झाल्याने योजना पुर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकली नाही. परिणामी शहरवासियांना भेडसावणारा पाणीप्रश्‍न कायम असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर कोकाटे यांनी योजनेचे ठेकेदार, नगरपालिका प्रशासन व पदाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा मुद्दा पुढे आल्यानंतर बुधवारी (दि.३०) साकुर फाट्यावरील एका मंगल कार्यालयात स्थानिक शेतकरी व व्यावसायिकांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते.याप्रसंगी व्यासपिठावर इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, सिन्नरचे प्रशिक्षणार्थी तहसीलदार मराठे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, कार्यकारी अभियंता आर. डी. डोंगरे, उपकार्यकारी अभियंता मंगेश प्रजापती, सहाय्यक अभियंता अमीत धोरण, तलाठी तुषार सूर्यवंशी, पाणीपुरवठा विभागाच्या हेमलता दसरे आदी उपस्थित होते.कडवा पाणीपुरवठा योजनेसाठी साकुर फाटा येथून कडवा पंपिंग स्टेशन कडे सुमारे साडेसात किलोमीटरची ११ केव्हीची वीजवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यापैकी पंम्पींग स्टेशन ते साकुर फाटा असे पावणे नऊ कि.मी.चे काम पुर्ण झाले असून साकुर फाट्यावरील उपकेंद्र ते साकुर फाटा अशी सुमारे सव्वा दोन किलोमीटरची लाईन टाकण्याचे काम स्थानिकांच्या विरोधामुळे रखडले आहे. त्यामुळे योजनेचा दुसरा पंप सुरू करणे अवघड होऊन बसले आहे.स्थानिक शेतकरी, व्यावसायिकांच्या अडचणी समजू शकतो परंतु केवळ सव्वादोन कि.मी. अंतराच्या वीजवाहिनीचे काम रखडल्याने जवळपास लाखभर लोकसंख्या असलेल्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची बाब कोकाटे यांनी स्थानिकांच्या निदर्शनास आणून दिली.यावेळी स्थानिक शेतकरी, व्यावसायिकांच्या अडचणी, तक्रारी कोकाटे यांनी ऐकुण घेतल्या. राष्ट्रीय महामार्गाच्या पुढच्या बाजूने किंवा व्यवसायिक दुकानांच्या पाठीमागच्या बाजूने वीज वाहिनी टाकायची, यासंदर्भात स्थानिक शेतकरी तसेच व्यावसायिकांनी एकत्रीत चर्चा करुन पर्याय द्यावा, या पाणीपुरवठा योजनेसाठी जाणार्‍या वीजवाहिनीतून स्वतंत्र तरतूद करून व्यवसायिकांना २४ तास वीज पुरवठा देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी आमदारांनी स्थानिकांना दिली.याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारूवाला, नगरसेवक शीतल कानडी, मालती भोळे, वासंती देशमुख, निरुपमा शिंदे, रामभाऊ लोणारे, सुहास गोजरे, संतोष शिंदे, पंकज जाधव, सुनील गवळी, प्रशांत सोनवणे, पांडुरंग वारुंगसे, रतन जाधव आदींसह साकुर फाटा परिसरातील शेतकरी व व्यावसायिक उपस्थित होते.भरवीरला स्वतंत्र उपकेंद्र होणार...साकुर फाटा येथे वीजपुरवठ्यासाठी सातपूर येथून जवळपास ४९ कि.मी. अंतरावरून १३२ केव्ही लाईन टाकण्यात आली आहे. तथापि सातपूर ते साकुरफाटा हे अंतर जास्त असल्याने येथे वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याची समस्या मोठी आहे. साकुर फाटा तसेच या परिसरातील शेतकरी व नागरिकांची खंडीत वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी खापराळे येथून २० कि.मी. अंतरावरुन ३३ केव्ही लाईन टाकून भरवीर येथे स्वतंत्र उपकेंद्र उभारण्याचे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच येथील शेतकर्‍यांची वीज समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल.- माणिक कोकाटे, आमदार, सिन्नर. 

टॅग्स :electricityवीजtalukaतालुका