शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन विकासासाठी अधिक निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:05 IST

लोणजाईमाता मंदिर परिसर निसर्गसंपन्न असून, लोणजाई गड पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल, असे आश्वासन पर्यटन व रोजगार हमीमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

विंचूर : लोणजाईमाता मंदिर परिसर निसर्गसंपन्न असून, लोणजाई गड पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल, असे आश्वासन पर्यटन व रोजगार हमीमंत्री जयकुमार रावल यांनीदिले.येथून जवळच असलेल्या सुभाषनगर परिसरातील लोणजाई माता मंदिर परिसर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्यासाठी रावल यांनी शुक्रवारी मंदिर व परिसराची पाहणी केली. रावल यांच्यासमवेत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, निफाड पंचायत समितीचे सभापती पंडितराव आहेर, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, बापूसाहेब पाटील, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य डी.के. जगताप, नानासाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे आदि उपस्थित होते. निफाड तालुक्याचे आराध्यदैवत असलेल्या लोणजाई माता गडावर शेकडो भाविक येत असतात. तसेच लोणजाईमाता परिसर निसर्ग संपन्न असल्याने पर्यटकांची कायम वर्दळ असते. श्री स्वामी समर्थ केंद्र तसेच पंचायत समितीच्या वतीने येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्याचीदेखील रावल यांनी पाहणी करून भविष्यात येथे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येईल, असे आश्वासन देत उपस्थितांकडून लोणजाईमातेच्या मंदिराबाबत अधिक माहिती जाणून घेतली.यावेळी बापुसाहेब पाटील, वैकुंठराव पाटील, संजय वाबळे, नीलेश सालकाडे, नरेंद्र परदेशी, पं. स. सदस्य शिवा सुराशे, प्रांताधिकारी, गटशिक्षणाधिकारी रसाळ, नायब तहसीलदार संघिमत्रा, सरपंच ताराबाई क्षीरसागर, उपसरपंच आत्माराम दरेकर, काका दरेकर, सुभाषनगर सरपंच भिवाजी सोदक, उपसरपंच सोपान म्हाळशिकारे, मधुकर बाबूराव दरेकर, माणिक शास्त्री महाराज उपस्थित होते.