शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘दीपाली चव्हाण यांना न्याय द्या...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:15 IST

वनखात्यातील धाडसी महिला वनक्षेत्रपाल दीपाली चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी शासकीय क्वाॅर्टरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून शासकीय पिस्तुलाने छातीवर गोळी ...

वनखात्यातील धाडसी महिला वनक्षेत्रपाल दीपाली चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी शासकीय क्वाॅर्टरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून शासकीय पिस्तुलाने छातीवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्याचे वन खाते आणि सरकारही हादरले. याप्रकरणी नाशिक वनविभागात देखील संतापाची लाट पसरली असून वनखात्यातील वनधिकारी, सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनपाल दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या संघटनांनी एकत्र येत मंगळवारी (दि.३०) या घटनेचा निषेध नोंदिवला. या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांची भेट घेत निवेदन दिले.

शिवकुमारसह रेड्डी यांनाही सहआरोपी करत अटक केली जावी, तसेच आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करावी, चव्हाण यांना मरणोत्तर तरी लवकर न्याय मिळावा, यासाठी हा खटला जलद न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालविला जावा, यासाठी उच्च दर्जाच्या सरकारी अभियोक्ताची नियुक्ती सरकारने करावी, तसेच शिवकुमार व रेड्डी यांची विभागीय चौकशी त्वरित सुरू करावी आणि याप्रकरणात दोषी आढळून येणाऱ्या सर्वांविरुद्ध कारवाई करण्यात यावी आदी मागण्या निवदेनातून करण्यात आल्या आहेत. निवेदनावर राजपत्रित वनाधिकारी संघटनेच्या कार्यकारी सदस्य विभागीय वनधिकारी कांचन पवार, स्वप्नील घुरे, उदय ढगे, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, गणेश रणदिवे तसेच वनक्षेत्रपाल संघटनेचे अमोल आडे, प्रशांत खैरनार, सीमा मुसळे, पुष्पा सातारकर, प्रवीण डमाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---इन्फो

वनसंरक्षक कार्यालयात झळकविले फलक

गडकरी चौकातील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरात राजपत्रित वनधिकारी संघटना, वनक्षेत्रपाल, वनपाल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आरएफओ दीपाली चव्हाण यांना न्याय द्या, जस्टीस फॉर दीपाली, शिवकुमार यास बडतर्फ करा, असे घोषवाक्य लिहिलेले फलक दीपाली चव्हाण यांच्या छायाचित्रांसह झळकावून निदर्शने केली.

--इन्फो--

...तर काम बंद आंदोलनाचा इशारा

दीपाली चव्हाण यांना जलद न्याय न मिळाल्यास आणि रेड्डी व शिवकुमार यांना सेवेतून बडतर्फ न केल्यास नाशिक वनखात्यातील वनधिकारी, वनक्षेत्रपाल यांनी काम बंद आंदोलनाचा इशाराही निवेदनात दिला आहे.

--

फोटो आर वर ३०फॉरेस्ट-१ /२

===Photopath===

300321\30nsk_13_30032021_13.jpg~300321\30nsk_14_30032021_13.jpg~300321\30nsk_15_30032021_13.jpg

===Caption===

वनअधिकारी यांचे निवेदन~वनअधिकारी यांचे निवेदन~वनअधिकारी यांचे निवेदन