शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना मोफत औषधे द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:26 IST

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. याबाबत शहरातील डाव्या आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मांढरे यांनी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

ठळक मुद्देनिवेदन : डाव्या आघाडीच्या नेत्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. याबाबत शहरातील डाव्या आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मांढरे यांनी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.समाजातील घटकांनी या काळात अधिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डावे पक्ष व किसान सभा, कामगार संघटना करत असलेल्या मदतकार्याबाबतची माहिती जिल्हधिकाºयांना देण्यात आली. शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांचीही भेट घेऊन अडचणींबाबत विचार-विनिमय केला. मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा करून शहरात असलेल्या परिस्थितीबाबत जलद गतीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, अशी विनंती करून त्यांना सूचनांचे निवेदन देण्यात आले. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका गेल्या तीन महिन्यांपासून अथक परिश्रम घेत आहेत. त्यांच्या मदतीला त्वरित कर्मचारी भरती करण्यात यावी. कोरोना उपचाराबाबत संभ्रम आहे, याबाबत जनतेला योग्य पद्धतीने माहिती मिळावी यासाठीची हेल्पलाइन अधिक सक्षम करण्यात यावी, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशा संख्येने सुरक्षा साधनांसह कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.शिष्टमंडळात कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, शेतकरी कामगार पक्षनेते माजी उपमहापौर अ‍ॅड. मनीष बस्ते, भाकपचे राज्य सचिव राजू देसले, माजी नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे आदींचा समावेश होता. कोरोना रुग्णांना अत्यवस्थ झाल्यास जे इंजेक्शन द्यावे लागतात ते अत्यंत महागडे आहे. गरीब व मध्यमवर्गातील रुग्णांना इंजेक्शन बाहेरून घेणे परवडत नाही. या आजारावर उपचारासाठी लागणारे औषधे व इंजेक्शन शासनातर्फे व महापालिकेच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात यावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicinesऔषधं