शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोनशे कोटींच्या ठेवी द्या

By admin | Updated: May 27, 2017 00:49 IST

नाशिक : राज्य शिखर बॅँकेच्या अधिकाऱ्यांची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यास सशर्त मंजुरी देण्यात आली.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शिखर बॅँकेकडून मदत हवी असल्यास राज्य शिखर बॅँकेच्या अधिकाऱ्यांची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यास शुक्रवारी (दि. २६) जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सशर्त मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिली.जिल्हा बॅँकेच्या द्वारका येथील मुख्यालयात संचालक मंडळाची तातडीची मासिक बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीत विविध प्रकारच्या १६ विषयांवर चर्चा झाली. राज्य शिखर बॅँकेने निर्देश दिल्याप्रमाणे जिल्हा बॅँकेच्या रिक्त असलेल्या कार्यकारी संचालकपदावर राज्य शिखर बॅँकेच्या व्यवस्थापकांच्या नियुक्तीचा विषय मंजुरीसाठी बैठकीत ठेवण्यात आला होता. ही नियुक्ती १६ प्रकारच्या विविध अटी-शर्तींवर देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यातील सुरुवातीच्या १ ते ११ अटी-शर्ती मान्य करण्यात येऊन राज्य शिखर बॅँकेच्या कार्यकारी संचालकांना जिल्हा बॅँकेवर नियुक्तीस हिरवा कंदील दाखविण्यात आला; मात्र १२ ते १६ क्रमाकांच्या अटी-शर्ती मान्य नसल्याचे संचालकांचे म्हणणे आहे. यातील १२ ते १६ क्रमांकांच्या अटी-शर्ती जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या आहेत. त्यातील एक अट म्हणजे संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्यात एखाद्या विषयावर एकमत नसल्यास त्या विषयावर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शिखर बॅँकेला देण्यात यावे, या अटीस संचालक मंडळाने मान्यता दिली नसल्याचे कळते. बैठकीस उपाध्यक्ष सुहास कांदे, संचालक शिरीषकुमार कोतवाल, परवेज कोकणी, किशोर दराडे, गणपतराव पाटील यांच्यासह १३ ते १४ संचालक उपस्थित असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.