शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूखच्या भेटीसाठी मुलींनी गाठले ‘मन्नत’

By admin | Updated: May 25, 2017 01:50 IST

नाशिक :नाशिकमधील एकाच कुटुंबातील सहा अल्पवयीन मुलीही शाहरूखला पाहण्यासाठी घरातील कुणालाही न सांगताच रेल्वेने त्यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर जाऊन पोहोचल्या़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : चित्रपटातील हिरो-हिरोइन यांचे आकर्षण केवळ युवावर्गालाच नाही तर लहानग्यांनाही आहे़ त्यात बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या फॅन्सची तर बातच न्यारी़ त्याची एक झलक बघण्यासाठी मुंबईतील ‘मन्नत’ बंगल्याबाहेर फॅन्सची नेहमीच गर्दी असते़ नाशिकमधील एकाच कुटुंबातील सहा अल्पवयीन मुलीही शाहरूखला पाहण्यासाठी घरातील कुणालाही न सांगताच रेल्वेने त्यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर जाऊन पोहोचल्या़ घरातील सहाही मुली एकाचवेळी गायब झाल्याने पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली़ म्हसरूळ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक उत्तम पवार आणि महिला पोलीस शिपाई प्रिया विघे यांनी अथक मेहनत घेऊन अवघ्या २४ तासांत या मुलींना मुंबईहून ताब्यात घेतले अन् पालकांच्या स्वाधीन केले़ मूळचे गुजरातच्या सौराष्ट्रमधील; मात्र व्यवसायानिमित्त नाशिक शहरात स्थायिक झालेले दोघे भाऊ आपल्या कुटुंबीयांसह पेठ परिसरात राहतात़ या दोघा भावांना प्रत्येकी तीन मुली असून, त्यांचे वय १२ ते १५ च्या दरम्यान आहे़ या सहाही मुलींना चित्रपटातील हिरो-हिरोइनचे प्रचंड आकर्षण़ त्यातच आपल्या पालकांसोबत मुंबईला फिरण्यासाठी गेलेल्या या मुलींनी शाहरूखचा मन्नत हा बंगला देखील बघितलेला होता़ मंगळवारी (दि़ २३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास या सहाही मुली घरातून निघाल्या आणि त्यांनी थेट सप्तशृंग गड गाठला़घरातून पलायन केलेल्या या अल्पवयीन मुली पहाटे चार वाजेच्या सुमारास दिंडोरी नाक्यावर आल्या व त्यानंतर नाशिकरोड रेल्वे स्टेशनला पोहोचल्या़ यानंतर शताब्दी एक्स्पे्रसने दादर व तेथून बांद्रा येथील शाहरूखच्या मन्नत बंगल्याजवळ पोहोचल्या़; मात्र या कालावधीत मुली कोठे गेल्या असतील या चिंतेने पालकांना ग्रासले होते़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांनी ही माहिती पोलीस आयुक्त, उपायुक्त तसेच सहायक पोलीस आयुक्तांना दिली होती़ पालकांनी मुली मुंबईला जाऊ शकतात अशी शक्यता वर्तविल्याने पोलीस नाईक पवार व पोलीस शिपाई विघे यांना मुंबईला तपासासाठी पाठविण्यात आले़ यापूर्वी रेल्वे पोलीस, ठाणे, कसारा, कल्याण पोलीस ठाण्यास व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मुलींचे फोटो पाठविण्यात आले होते़ पवार व विघे या दोघांनी रात्रभर मुंबईतील विविध बसस्थानके तसेच रेल्वेस्थानकांवर पाहणी केली़ यानंतर शाहरूखचे आकर्षण असल्याची माहिती मिळताच बांद्रा येथील मन्नत बंगल्यासमोर गेले असता तिथे या मुली आढळून आल्या़ त्यांनी या मुलींना ताब्यात घेऊन नाशिकला आणले़ यानंतर पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी या मुलींचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा असे न करण्याचे सांगून पालकांच्या स्वाधीन केले़ या मुलींना पाहून पालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते़ या कामगिरीमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा हांडोरे, पोलीस हवालदार माळोदे, देवरे, पोलीस शिपाई रेहेरे यांचा विशेष सहभाग होता़