शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींनी रचला अपहरणाचा बनाव चेहडी येथील घटना : जळगाव रेल्वेस्थाकावर आढळल्या मुली

By admin | Updated: February 18, 2015 00:25 IST

विद्यार्थिनींनी रचला अपहरणाचा बनाव चेहडी येथील घटना : जळगाव रेल्वेस्थाकावर आढळल्या मुली

  नाशिकरोड : पत्ताविचारण्याच्या बहाण्याने एका इसमाने थांबविल्यानंतर पुढे आम्हाला थेट रेल्वेगाडीतच जाग आली अशी आपल्याच अपहरणाची कहाणी विद्यार्थिनीनी रचल्याचा प्रकार तपासात उघडकीस आला. चेहेडी पंपिंग येथील इयत्ता नववीतील तीन विद्यार्थिनी सकाळी शाळेत जादा तासिका असल्याने शाळेत जाण्यासाठी निघाल्या, मात्र दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एका विद्यार्थिनीने आपल्या पालकांना दूरध्वनी करून आपण रेल्वेगाडीत असल्याचे सांगितले. सकाळी शाळेत जाताना रस्त्यात टायर पंक्चरच्या दुकानाजवळ तीन ते चार अनोळख्या इसमांनी आम्हाला एक पत्ता वाचण्यास दिला. त्यानंतर आम्हाला काहीच कळले नाही. आता आम्ही रेल्वे गाडीत असून, जळगाव जवळ पोहोचलो असल्याचे सांगितले. विद्यार्थिनींच्या या फोनमुळे पालकांना धक्काच पोहचला. मुलींचे अपहरण झाल्याची बाब गावात पसरल्याने एकच कल्लोळ उडाला. गावकऱ्यांनी धावतच शाळा गाठली असता तिघी मैत्रिणींपैकी एक शाळेत येऊन गेल्याचे समजले, तर दुसऱ्या दोघी शाळेत आल्याच नसल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. काही मिनिटांतच तीनही मुलींच्या पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी आपल्या मुलींनी केलेल्या फोनवरील माहिती पोलिसांना सांगितले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, उपनिरीक्षक रवींद्र कऱ्हे, ठाणे अंमलदार राजेंद्र वाघ यांनी तत्काळ जळगाव रेल्वे पोलीस ठाणे व तेथील अधिकाऱ्यांना संपर्क साधला. मुलींनी ज्या मोबाइलवरून संपर्क केला होता. त्यावर पोलिसांनी संपर्क साधला असता तो भ्रमणध्वनी एका शाहरूख नावाच्या इसमाला लागल्याने साऱ्यांनाच धडकी भरली. पोलिसांनी त्या इसमाची चौकशी केली असता प्रवासात त्या भेटल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्यास मुलींना जळगाव रेल्वे पोलीस चौकीत सोडून देण्याचे सांगितले.