शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुलींमध्ये रचना क्लब, मुलांमध्ये उत्कर्ष क्लबला अजिंक्यपद

By admin | Updated: May 11, 2014 22:27 IST

कुमार-कुमारी चषक कबड्डी स्पर्धा

कुमार-कुमारी चषक कबड्डी स्पर्धानाशिक : येथे सुरू असलेल्या कुमार-कुमारी गटाच्या आमदार जयंतराव जाधव चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या मुलींच्या गटाचे विजेतेपद रचना क्लबने पटकावले, तर मुलांच्या गटात गतविजेत्या सय्यदपिंप्रीच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाने अजिंक्यपद कायम राखले.क्रीडा प्रबोधिनी व जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. मंगेश चव्हाण, अनिल ढिकले, हरीश गुप्ता, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मोहन गायकवाड, दौलतराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.मुलींच्या गटात सुपर लीगच्या धर्तीवर रचना स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावले. रचना क्लबने लीगमध्ये क्रीडाभारती, गुलालवाडी आणि शिवशक्ती आडगाव या संघांवर मात करीत ६ गुणांची कमाई केली होती, तर उपविजेत्या ठरलेल्या क्रीडाभारतीने शिवशक्ती आडगाव व गुलालवाडी संघाला नमविले. रचना क्लबकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे चार गुण झाले होते. रचना क्लबकडून निकिता पवार, सोनाली धोत्रे, प्रणाली लहानगे यांनी उत्कृष्ट खेळ केला, तर क्रीडाभारतीकडून श्रुती जाडर, संजना गायकवाड, समीरा सय्यद यांनी उत्कृष्ट खेळ केला. मुलांच्या गटामध्ये क्रीडा प्रबोधिनी संघाने उपांत्य फेरीत नांदुर्डीच्या जनता विद्यालयास नमवून अंतिम फेरी गाठली, तर गतविजेत्या सय्यदपिंप्रीच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाने मोहोळच्या जय बजरंग व्यायामशाळेला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत गतविजेत्या सय्यदपिंप्रीच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाने क्रीडा प्रबोधिनीला ११ गुणांनी नमवून अजिंक्यपद कायम राखले. उत्कर्ष क्रीडा मंडळाने क्रीडा प्रबोधिनीला ३०/१९ अशा फरकाने पराभूत केले. उत्कर्षकडून भगवान ढिकले, गणेश बोराडे यांनी, तर क्रीडा प्रबोधिनीकडून जयेश देवरे, राजू मांढरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.