वणी : सप्तशृंगगडावरील शीतकड्यावरून उडी मारून आत्महत्त्या केलेल्या युवतीची ओळख पटली असून, ती नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीची विद्यार्थिनी आहे, तर तिचे वडील सटाणा तालुक्यात ग्रामसेवक असून, मूळगाव अजमेर सौंदाणे येथील असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. सोमवारी एक युवतीचा मृतदेह शीतकडा परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने मंगळवारी वणी पोलीस व भातोडे येथील युवकांनी नऊ तासांच्या परिश्रमानंतर त्या युवतीला शोधून काढला. मृतस्थितीत असलेल्या युवतीला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान युवतीचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यात आले होते. कुटुंबीयांनी वणी येथे धाव घेतली. कल्याणी संजय पवार असे मृत युवतीचे नाव असल्याचे निष्पष्ण झाले. तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते अशी माहिती पुढे आली आहे. तीन दिवसांपासून ती बेपत्ता होती. वैफल्याच्या भावनेत तिने जीवनयात्रा संपविली असावी, अशी माहिती पुढे आली. शवविच्छेदन अहवालात उंचावरून उडी मारल्याने डोक्यास गंभीर मार लागून तिचा अंत झाल्याचे निष्पण झाले आहे. शीतकड्यावरून उडी मारल्याने मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली. (वार्ताहर)लक्ष्मी महिला पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभाअंदरसूल : येवला तालुक्यातील अंदरसूल येथील लक्ष्मी महिला नागरी सह. पतसंस्थेची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात चेअरमन संगीता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. यावर्षी सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सौ. देशमुख यांनी सहकारी संचालकांचा, ठेवीदार आणि सभासद यांचे आभार मानले व संस्थेच्या विकासात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी महिला सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. (वार्ताहर)
शीतकड्याजवळील मृतदेह सटाण्यातील युवतीचा
By admin | Updated: September 23, 2015 23:14 IST