शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीसह तिघींना पेटविले; चिमुरडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:14 IST

पंचवटी : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़ ६) पहाटेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील कालिकानगरमध्ये घडली़ या घटनेत नऊ महिन्यांची चिमुरडी सिद्धी रामेश्वर शेंडगे (नात) हिचा मृत्यू झाला असून, प्रेयसी व तिची मुलगी या ८० टक्के भाजल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, संशयित प्रियकर जलालुद्दीन खान हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़

ठळक मुद्देअनैतिक संबंधांतून वाद : मायलेकी गंभीर जखमी; प्रियकर फरार

पंचवटी : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़ ६) पहाटेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील कालिकानगरमध्ये घडली़ या घटनेत नऊ महिन्यांची चिमुरडी सिद्धी रामेश्वर शेंडगे (नात) हिचा मृत्यू झाला असून, प्रेयसी व तिची मुलगी या ८० टक्के भाजल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, संशयित प्रियकर जलालुद्दीन खान हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुलेनगर येथे राहणाऱ्या ४०वर्षीय महिलेचे परिसरातील जलालुद्दीन खान (५०, मूळ रा़ मथुरा, उत्तरप्रदेश) सोबत वर्षभरापासून अनैतिक संबंध होते़ हे दोघेही काही महिन्यांपासून एकत्र राहत होते, तर गत आठवड्यातच या महिलेने फुलेनगर येथील खोली सोडून मायको दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या कालिकानगरला भाडेतत्त्वावर खोली घेतली होती़ तीच्याकडे चार-पाच दिवसांपासून तिची कोणार्कनगरला राहणारी विवाहित मुलगी व नात सिद्धी रामेश्वर शेंडगे (९ महिने) या दोघी आल्या होत्या़ तर रविवारी जलालुद्दीन खान व महिला यांच्यामध्ये अनैतिक संबंधावरून वाद झाला होता़रविवारी रात्रीच्या सुमारास संशयित जलालुद्दीन हा महिलेच्या घरी आला असता तिने ‘तू तुझे कुटुंब व मूलबाळ सांभाळ, आत तुझ्या घरी जा’ असे वारंवार सांगितले; मात्र त्याने ऐकले नाही. यानंतर सोमवारी (दि.६) पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असलेली प्रेयसी, तीची मुलगी व नात सिद्धी शेंडगे यांच्या अंगावर रॉकेल ओतून खान याने पेटवून दिले़ यामध्ये सिद्धी शेंडगे या नऊ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला तर प्रेयसी व तीची मुलगी गंभीर जखमी झाल्या़ या दोघींनी आरडाओरड केल्याने शेजारील नागरिकांनी धाव घेतली असता या दोघीही जखमी अवस्थेत पडलेल्या होत्या़या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या मायलेकींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या दोघीही ७० ते ८० टक्के भाजल्या असून मृत्यूची झुंज देत आहेत़ दरम्यान, सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अधिकाºयांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली, तसेच परिमंडळ एकचे प्रभारी पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींची पाहणी केली़ या घटनेतील संशयित जलालुद्दीन खान पसार झाला असून, त्याच्या शोधासाठी पंचवटी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे़या घटनेप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित खानविरोधात खुनाचा तसेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गंभीररीत्या भाजलेल्या दोघींचेही जबाब पोलिसांनी व दंडाधिकाºयांनी नोंदवून घेतले आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे़